वडगाव आंबे येथे आदित्य ऍग्रो तर्फे कापसाला ७२५१/०० रुपयांचा भाव देत कापूस खरेदीचा शुभारंभ.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/१०/२०२२

पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे येथील मा. श्री. रविंद्र महाजन यांच्या आदित्य ऍग्रो कडून आज वडगाव आंबे येथील प्रतिष्ठित शेतकरी मा. श्री. उत्तम शिंदे व ज्योतीराम (भुराभाऊ) कांबळे यांच्या हस्ते काटा पूजन व प्रतिष्ठित नागरिक मा. श्री. अनिल आबा वाघ (पाटील) यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून तर कापूस उत्पादक शेतकरी मा. श्री. निलेश राठोड यांचा तंटामुक्ती अध्यक्ष मा. श्री. पितांबर सपकाळे यांच्या हस्ते सत्कार करुन कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.


या शुभप्रसंगी कापसाला ७२५१/०० रुपयांचा भाव देण्यात येऊन दिवसभर कापूस घेऊन येणाऱ्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांचाही याच भावात कापूस खरेदी करण्यात आला. याप्रसंगी धनदाई कृषी केंद्राचे संचालक मा. श्री ‌ संजय देवरे, कायदेतज्ञ मा. श्री. मंगेशराव गायकवाड, मा. श्री. मच्छिंद्र थोरात, संजय थोरात, शेखर वाघ, रमेश आप्पा चव्हाण, प्रविण काळे, आबा शिंदे बहुसंख्य शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

ब्रेकिंग बातम्या