पुणे शहरात पत्रकारांवर पोलिसांकडून लाठीमार, महिला पत्रकाराच्या डोक्यातही मारली काठी. सत्यजित न्यूज कडून जाहीर निषेध.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०२/२०२२
पुणे येथे किरीट सोमय्या यांच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी झाल्याचे कारणावरून पोलिसांना लाठीचार्ज करावा लागल्याची प्रथम माहीती समोर येत असली तरी पोलिसांनी याच संधीचा फायदा घेत पत्रकारांवर असलेला राग काढण्यासाठी उत्तम संधी साधून प्रिंट मिडीयाह इतर प्रसारमांध्यमांच्या प्रतिनिधींंवर लाठीचार्ज केला असून यात ए.बी.पी. माझा सारख्या मोठ्या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींवर सुद्धा लाठीचार्ज करण्यात आला असून यात एक महिला पत्रकाराच्या डोक्याला लाठी लागल्याने मोठी दुखापत झाल्याची बातमी समोर येत आहे.
हा लाठीचार्ज जमलेल्या जमावाला आटोक्यात आणण्यासाठी करत असतांंना याच ठिकाणी आपल्या गळ्यात ओळखपत्र, बुम व इतर प्रसारमाध्यमांची ओळख पटेल अश्या ओळखीतल्या पत्रकारांवर सुद्धा लाठीचार्ज करण्यात आल्यामुळे पोलिसांनी हा लाठीचार्ज स्वताच्या मर्जीने केला की यामागे कुणाचा हात आहे अशी शंका निर्माण झाली असून या प्रकारामुळे महाराष्ट्रातील पत्रकारांनी याबाबत तिव्र निषेध नोंदवून या प्रकाराची सखोल चौकशी होऊन संबधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी केली असून याचा जाब विचारणार आहेत.
या घटनेबद्दल जळगाव जिल्हा व पाचोरा तालुक्यातील विविध पत्रकार संघटना व सत्यजित न्यूज कडून जाहीर निषेध करण्यात येत असून स्वताची अकार्यक्षमता व नाकर्तेपणा झाकण्यासाठी तसेच राजकीय षडयंत्र किंवा सडेतोड पत्रकारीता पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे कारणावरून हा लाठीचार्ज केला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.