जामनेर येथे मराठा समाज वधू वर परिचय मेळावा व सूची पुस्तिकेचे प्रकाशन मोठ्या उत्साहात संपन्न.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/१२/२०२१
जामनेर येथे आज दिनांक २५ डिसेंबर शनिवार रोजी येथील विशाल लॉन्स भुसावळ रोड येथे सकल मराठा समाजाचा वधू वर परिचय मेळावा व सूची पुस्तकीचे प्रकाशन मोठ्या उत्सवात संपन्न झाला. या मेळाव्यास मराठा समाजाची उच्च न्यायालयात आरक्षण विषयक बाजू मांडणारे विनोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपवर वर व वधुंनी आपला परिचय करून दिला. यात परिचय करून देणाऱ्या मध्ये मुलींपेक्षा उपवर मुलांचे प्रमाण जास्त दिसून आले. एकूण २०० वधू वरांनी या ठिकाणी आपला परिचय करून दिला. यावेळी समाजबांधवांना समाज मार्गदर्शन करतांना विनोद पाटील बोलत होते… छत्रपतींचे नाव घेतांना महाराजांना आवडणारी एकच गोष्ट होती ती म्हणजे माता भगिनींचा सन्मान व आदर करणे. ही एकच गोष्ट जर कटाक्षाने पाळली तर कुठेही कोपर्डी सारखी घटना घडणार नाही व देशातील भगिनी सुरक्षित कुठेही फिरू शकतील असे मत व्यक्त केले.
तसेच आरक्षणाची बाजू मांडताना आपण सर्वांनीच मला मोलाची साथ दिली. कुठे तरी आपण कमी पडलो म्हणून आपल्याला यश मिळाले नाही. यासाठी राज्याचे आजचे सरकार व मागचे सरकार हे दोन्ही ही शासन याला जबाबदार असल्याचे वक्तव्य यावेळी विनोद पाटील यांनी केले. यावेळी समाजाच्या प्रमुख वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर विनोद पाटील , आबासाहेब पाटील, डी एन चौधरी, संजय गरूड, डी के पाटील, दिलीप खोडपे सर, डॉ. मनोहर पाटील,तुषार पाटील, सौ. वंदना चौधरी, विश्वजीत पाटील, जे.के. चव्हाण, माजी प. स. सभापती निता पाटील,जळकेकर महाराज, प्रा शरद पाटील, प्रमोद (नाना)पाटील, नाना राजमल पाटील, दिलीप पाटील, डॉ. प्रशांत भोंडे, डॉ. नंदलाल पाटील, श्रीराम पाटील, डॉ.बाजीराव पाटील, राजमल भागवत,दीपक पाटील, जि. प.सदस्य प्रमिला पाटील, कमलाकर पाटील, भगवान शिंदे,दशरथ पाटील, प्रल्हाद बोरसे, अर्जुन पाटील, दत्ता साबळे, प्रवीण गावंडे,राम अपार, अमोल पाटील, योगेश पाटील, रवी हडप, यांच्यासह विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणारी मंडळी व समाजातील प्रतिष्ठित मंडळी या वेळी मेळाव्याला उपस्थित होते.
रात्रं दिवस सकल मराठा समाजाच्या वधू, वर परिचय मेळाव्यासाठी झटणाऱ्या मंडळींचे या वेळी अभिनंदन करण्यात येऊन त्यांना प्रशस्ती पत्र देण्यात आले. तसेच तालुक्यातील भागदरा येथील शेळके ह्या शेतकरी कुटुंबाचा ही सत्कार यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला. या पाच भावांच्या कुटुंबातील उच्च शिक्षित मुलांनी नौकरीच्या मागे न लागता शेतीला प्राधान्य देत उत्कृष्ट शेती करून ७५ एकर शेती असतांना त्यात भरघोस उत्पन्न काडून १७५ एकर पर्यंत वाढविली. त्यामुळे समाजातील मुलींनी नौकरी करणाऱ्या मुलांशीच लग्न करु हा हट्ट सोडून शेतकरी स्थळ शोधावे अशी भावना मेळाव्यास आलेल्या उपस्थितांमधून व्यक्त होत होती. सुत्रसंचलन किशोर खोडपे, एस. टी. चौधरी यांनी केले.