नारायण राणे यांना जामीन मंजूर.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०८/२०२१
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने गोत्यात आलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड येथील न्यायालयाने रात्री उशीरा जामीन मंजूर केला आहे.
आजचा संपूर्ण दिवस हा नारायण राणे यांच्या अटकेमुळे चांगलाच गाजला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे प्रकरण आता चांगलेच तापले असून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. नाशिक, महाड आणि पुणे येथे राणेंच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यानंतर जळगावसह अन्य ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. राणे यांना पोलिसांना ताब्यात देखील घेतले.
यानंतर नारायण राणे यांनी महाड येथील कोर्टात धाव घेतली. त्यांच्यासाठी रात्री उशीरापर्यंत कोर्टात युक्तीवाद सुरू होता. अखेर राणे यांना रात्री पावणे अकराच्या सुमारास कोर्टाने जामीन मंजूर केला. यामुळे राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पोलिसांनी त्यांना सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र ही मागणी धुडकावून लावत कोर्टाने राणे यांना जामीन मंजूर केला आहे.