दिव्यांग दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/१२/२०२२

डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो. म्हणून या दिवसाचे औचित्य साधून भडगाव तालुक्यातील समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव व शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सदर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

या जनजागृती रॅलीमध्ये भडगाव शहरातिल आदर्श कन्या विद्यालय, लाडकुबाई विद्यालय व वाय. एम. खान उर्दू हायस्कूल या शाळेंच्या शिक्षक व विद्यार्यांनीवर्ग गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी, विस्ताराधिकारी गणेश पाटील, आदर्श कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. पी. रोकडे, लाडकुबाई विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वैशाली पाटील, वाय. एम. खान. हायस्कूलच्या करीश्मा मॅडम व विद्यालयातील शिक्षक विद्यार्थी यांचा सक्रिय सहभाग नोंदवला.

जनजागृती रॅली आदर्श कन्या विद्यालयातिल प्रांगणातुन निघुन भडगाव शहरातिल बस स्थानक, पेठमार्गे तहसिल कार्यालयापर्यंत काढण्यात येऊन याच ठिकाणी रॅलीची सांगता करण्यात आली ही रॅली यशस्वी करण्यासाठी गटसाधन केंद्र कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

ब्रेकिंग बातम्या