नागपूर ~उमरेड येथील काँग्रेस नवयुवकांचे , मोदी सरकार विरोधात तिव्र आंदोलन.
प्रदीप कोळी.(नागपूर)
दिनांक.६/0८/२०२१
नागपूर जिल्ह्यातील उमरेड या तालुक्यातील भारतीय काँग्रेसच्या युवकांनी पेट्रोल, गॅस, खाद्यतेल व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढी विरोधात तसेच सुशिक्षित, उच्चशिक्षित तरुणांना हाताला काम नसून नवीन नोकऱ्यांची संधी मिळत नसल्याने मोलमजुरी करुन आपला उदरनिर्वाह भागविण्यासाठी धडपड करत असतांनाच सततच्या लॉकडाऊनमुळे हातचे होते नव्हते ते कामही बंद झाल्यामुळे उदरनिर्वाह होत नसल्याने घरातील मुलांच्या पुढील शिक्षणाचा, आईवडील यांच्या औषधपाण्यासाठी मजबुर झालेल्या तरुणांनी हाताला कामद्या अशी मागणी करत आई जेऊ चालेना व बाप भिक मागु देईना अशी परिस्थिती झाल्यामुळे मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत दिल्ली येथील संसद भवनावर घेराव आंदोलन करुन मोदी सरकारचा तिव्र निषेध केला.
या आंदोलन प्रसंगी आंदोलन कर्त्या तरुणांवर पोलिसांनी लाठीमार केल्यामुळे तरुणांचे अश्रू अनावर झाले होते. आम्ही सरकारकडे भिक किंवा अनुदान मागायला गेलो नव्हतो तर हाताला काम व योग्य दाम द्या अशी मागणी करण्यासाठी गेलो असता आमच्याशी चर्चा करुन आमच्या समस्या ऐकून घेत आम्हाला समजून घेणे महत्त्वाचे असतांना आमच्यावरच लाठीचार्ज केला गेला ही खेदाची बाब असून आपल्या भारतात खरच लोकशाही आहे का ? असा प्रश्न पडतो अशा संतप्त भावना या मोर्च्यातील नवयुवकांनी व्यक्त केल्या नवतरुणांना हाताला काम नसल्याने काही तरुण वर्ग पोटाची खळगी भरण्यासाठी वाममार्गाला जात आहे. तर काही तरुण नैराश्याने आत्महत्या करत आहेत. म्हणून.सरकारने या गोष्टींचा त्वरित विचार न केल्यास आम्ही शांत बसणार नाही. आमचा लढा असाच सुरुच राहील यापुढे आम्ही जेलभरो आंदोलन करु कारण कारागृहात तरी आम्हाला दोन घास खायला मिळतील असे मत व्यक्त केले.
या आंदोलनात राष्ट्रीय महासचिव,बंटी शेडके,शुभम गिडकर, शैलेश तिरपुडे, अक्षय वाघमारे युवक काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी,व कार्यकर्ते सामील झाले होते.
या आंदोलनातील कार्यकर्त्यावर दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज करत ताब्यात घेऊन ६८ नुसार अटक करुन ६९ नुसार सोडून दिले.
या हुकमी सरकारच्या राज्यात आंदोलनकर्त्यांना अमानुष पणे मारठोक.