गोंदेगाव येथे गजानन क्लिनिकचे शानदार उदघाटन.

प्रज्वल चव्हाण(गोंदेगाव)ता.सोयगाव
दिनांक~१५/०५/२०२१
गोंदेगाव येथील डॉ.रविप्रसाद चौधरी यांच्या गजानन क्लिनिकचा उद्घाटन सोहळा कन्नड, सोयगाव तालुक्याचे लाडके आमदार मा.श्री.उदयसिंग राजपूत यांच्या हस्ते फित कापून व मोनालीताई राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत सोशल डिस्टंसिगचे नियम पाळत मोठ्या उत्साहात पार पडला.
गजानन क्लिनिकच्या उदघाटन सोहळ्या प्रसंगी उपस्थित असलेले सोयगाव पोलिस स्टेशनचे पी.आय.मा.श्री. सुदाम शिरसाट यांचा शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या उदघाटन प्रसंगी आमदार मा.श्री.उदयसिंग राजपूत यांनी डॉ. रविप्रसाद चौधरी यांना शुभेच्छा देत कोरोनाच्या कालावधी रुग्णांना सेवा देण्यासाठी अहोरात्र कार्यरत राहून योग्य वेळी योग्य मोबदला घेऊन रुग्णांवर उपचार करुन त्यांना जीवदान देण्याचे काम करावे कारण या भुतलावर डॉक्टरांना देव माणले जाते. योग्य उपचारपद्धतीने ते जीवदान देतात असेच कार्य आपल्याहातून घडो अशी अपेक्षा व्यक्त केली.
या दवाखान्याच्या उदघाटन प्रसंगी ग्रा.प.सरपंच वनमाला निकम,उपसरपंच दीपक अहिरे,सदस्य अतुल बोरसे, प्रशांत चौधरी,गौरव बिंदवाल,समाधान सूर्यवंशी,विजय नगरे सर,दीपक खोडके,व डॉ.प्रवीण दादा चौधरी,प्रा.शांतीलाल चौधरी सर ,आबाराव चौधरी,पल्लवी चौधरी,व समस्त गावकरी उपस्थित होते.