पाचोऱ्यातील रंगश्री आर्ट फांऊंडेशनची फाईन आर्ट सी.ई.टी.त पुन्हा एकदा गगन भरारी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/०१/२०२२
महाराष्ट्र शासनाची फाईन आर्ट सी.ई.टी. परीक्षा २०२१ मध्ये घेण्यात आली होती. यात पाचोरा येथील रंगश्री आर्ट फाऊंडेशन या ड्रॉईंग अँड पेंटींग क्लासेसमधून श्रेयश गोपाल चिंचोले, शुभम देविदास पाटील, यांना कलेचे माहेरघर मुंबई येथे प्रवेश मिळाला होता. या परीक्षेतून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट च्या जे. जे स्कुल ऑफ आर्ट ,मुंबई, तसेच औरंगाबाद, नागपूर कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो. या फाईन आर्ट सी.ई.टी मध्ये पाचोऱ्यातील रंगश्री आर्ट फाऊंडेशन या ड्रॉईंग क्लासेसच्या 2 विद्यार्थ्यांनपैकी एक श्रेयस चिंचोले यास सर जे.जे.इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट व शुभम पाटील, लोहटार यास जे जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथे सिरॅमिक पॉटरी प्रवेश मिळविला आहे आतापर्यंत 6 ते 7 विद्यार्थी aplied मध्ये प्रवेशित आहे. “या वर्षी सिरॅमिक विभागात रंगश्रीचा पहिल्यांदा विद्यार्थी प्रवेश झाला आहे. श्रेयश ने ऑईल कलर पेन्सिल या माध्यमातून श्री स्वामी समर्थ, बाप्पा, पानिपत मधील सदाशिवराव भाऊ, अशी चित्र तयार केली.शुभम ने अनेक ,अँकरॅलीक कलर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज, गणपती बाप्पा सिनेमा सृष्टीतले कलाकार अशी अनेक चित्रे वत्याने साकारली आहे.पाचोरा तालुक्यातून पहिल्यांदा या रंगश्री चा विद्यार्थी विवेक महाजन नॅशनल पातळी पर्यंत NID ,Bhopal साठी प्रवेश झाला .रंगश्री परिवारातर्फे तिघांचे हार्दिक अभिनंदन. पाचोरा परिसरातील विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर व्यावसायिक, डॉक्टर ,गृहिणी यांच्या मध्ये 7 ते 8 वर्षांपासून रंगश्री कलेची गोडी निर्माण करत आहे . रंगश्री तुन fine art, आर्किटेक्ट या क्षेत्रातील NATA, डिझाइन क्षेत्रातील NID, UCEED, फॅशन क्षेत्रात NIFT याविविध CET ची पूर्व तयारी केली जाते.
संस्थापक स्व. एम .सी.सोनार सर यांनी स्थापित केलेल्या रंगश्रीच्या अध्यक्षा श्रीमती मंजुळा मुरलीधर सोनार,सुबोध कांतायन भारती कांतायन,अजय पाटील, विशाल सोनवणे,वैभव शिंपी अक्षय पाटील, आकाश सावंत तन्मय पाटीलयांनी सत्कार करून त्यांचे कौतुक केले.