पाचोरा येथे संत हरदेवसिहजी महाराज जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीर.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०२/२०२१
संत निरंकारी मंडळ,दिल्ली(रजि.)ब्रांच पाचोरा तर्फे प.पु.सतगुरु बाबा हरदेवसिंह जी महाराज यांची २३ फेब्रुवारी जयंती दिवस निमित्त दिनांक २१ फेब्रुवारी वार रविवार रोजी सकाळी ८ ते दुपारी २ वाजे पर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन संत निरंकारी सत्संग भवन जामनेर रोड पाचोरा या ठिकाणी आयोजन करण्यात आला आहे.हरदेवसिहजी महाराज१९८० ते २०१६ प्रयत्न निर्णकारी मंडळाचे प्रमुख गुरु होते. दर वर्षी सं. नि.मंडळाच्या वतीने रक्तदान कार्यक्रमात रक्तदान करण्यासाठी शेकडो भाविक व रक्त दाते पूर्ण श्रध्देने रक्तदान करतात व त्यांना त्वरित प्रमाण पत्र दिला जातो. सतगुरू बाबाजींच्या कथनानुसार “रक्त नालियों में नहीं नाड़ीयों बहना चाहिए।” या संत वचनाचे पालन म्हणून सर्व भाविक व रक्त दाते या सेवेत सहभागी होतात,यावेळी सुद्धा सर्व जनतेने रक्तदान करून संपूर्ण मानवतेची सेवा करू या असे आवाहन संत निरंकारी मंडळ पाचोरा ब्रांच चे मुखी प.पू.महेश वाघजी यांनी केले आहे.