कुऱ्हाड बुद्रुक येथे विद्युत चोरी उघड वरखेडीचे कनिष्ठ अभियंता चव्हाण यांची धडक कारवाई. विद्यूत चोरांचे धाबे दणाणले.
दिलीप (पाचोरा)
दिनांक~१३/०७/२०२१
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या कुऱ्हाड बुद्रुक येथील मोहल्ला भागात एका घरात विद्यूत चोरी चोरी होत असल्याची माहिती वरखेडी येथील विद्युत वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता मा.श्री. चव्हाण साहेब यांना मिळाली होती या माहितीवरून चव्हाण यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह कुऱ्हाड येथील मोहल्ला परिसरातील विद्यूत चोरी करत असलेल्या घरावर छापा टाकून विद्यूत चोरीसाठी खांबावरून टाकलेले आकोडे तसेच घरात सुरु असलेली विद्युत उपकरणे ताब्यात घेऊन विद्युत चोरांविरुद्ध कारवाई केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
परंतु ही कारवाई झाल्यानंतर संबंधित विद्युत चोराला वाचवण्यासाठी काही हितचिंतकांनी हालचाली सुरू केल्या असून विद्युत चोरी दडपण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे खात्रीपूर्वक समजले असून कनिष्ठ अभियंता चव्हाण यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता थेट कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
(विद्युतवाहिनी वर आकोडे टाकून वीजचोरी करण्याचे प्रमाण गावागावातून बऱ्याच ठिकाणी वाढले असून या विद्युतचोरांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी पंचक्रोशीतील गावागावातून होत आहे.)