ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी सुरेश तांबे तर जिल्हा कार्याध्यक्षपदी कुंदन बेलदार यांची निवड.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०४/२०२२
पारोळा येथील शासकीय विश्रामगृह येथे दिनांक ७ एप्रिल २०२२ गुरुवार रोजी ग्रामीण पत्रकार संघ (महाराष्ट्र राज्य) ची बैठक विभागीय अध्यक्ष राजूभाई आले जावरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष चंदाताई शिरसाट, विभागीय अध्यक्ष मा. श्री. राजूभाई जावरे यांनी स्व. पी. एल. शिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघ (महाराष्ट्र राज्य) जळगाव जिल्हा अध्यक्षपदी पाचोरा येथील तरुण भारतचे पत्रकार मा. श्री सुरेश धनराज तांबे यांची तर जिल्हा कार्याध्यक्षपदी मा. श्री. कुंदन बेलदार यांची सर्वानुमते नियुक्ती करुन त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी विभागीय सचिव भीमराव खैरे, अशोक कापडणे, मंगेश पाटील (उ. म अध्यक्ष), फिरोज देशमुख, पाचोरा तालुकाध्यक्ष राकेश जावरे, दयाराम मोरे, आर. टी. सोनार, रमेश पवार, लक्ष्मण लोखंडे, आदी पत्रकार संघाचे अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. ग्रामीण पत्रकार संघ जळगाव जिल्हाध्यक्षपदी सुरेश तांबे व कार्याध्यक्षपदी कुंदन बेलदार यांची निवड झाल्याने त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.