यमराज थोडं थांबा ! पॅकिंग करु दया, असे फर्मानच देणाऱ्या खऱ्या कोरोना योद्धांचा सत्कार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०५/२०२१
ज्या ठिकाणी सर्वसामान्य व्यक्तीच काय रक्ताच्या नात्यातील लोकांनीही पाठ फिरवली अशा पाचोऱ्या तालुक्यातील सर्वच ठिकाणी जाऊन मयत रुग्णाला यमराजांच्या ताब्यात देतांना यमराजालाही आदेशीत करून थोडं थांबा संपूर्ण पॅकेजिंग होऊन जाऊ द्या आणि मग न्या असे म्हणत अशा मयत रुग्णांची संपूर्ण पॅकेजिंग ची तयारी करत कोरोना विषाणू बाहेर पडून अधिकचा फैलाव होऊ नये यापासून जनतेच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेतली जाऊन अशी महत्वाची पॅकिंग आपल्या हातांनी पूर्ण करणारे देशसेवा करणारे खरे कोरोना योध्दा असलेले पीता – पुत्र अतिश चांगरे, सुरजभैरु चांगरे सह सौ.सरीता कतार चांगरे हे मायतांवर अंत्यसंस्कार करतात.
त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल या खऱ्याखुऱ्या कोरोना योद्धांचा पाचोरा पोलीस बॉईज असोसीएशन तर्फे पाचोरा ग्रामीण रुग्णालयात सत्कार करून गौरव करण्यात आले, कारण नेहमीच अतिष चांगरे यांकडून बेवारस मृतांच्या अंत्यविधीसाठी कफन – कापड तसेच रुग्णवाहिकेचा खर्च स्वतः करून ही सेवा पूर्णतः मोफत देऊन जनसेवा अहोरात्र जनसेवा करत आहेत, याबद्दल त्यांचे सर्वदूर कौतुक होत असून या सत्काराच्या प्रसंगी ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित साळुंखे तसेच पाचोरा पोलिस बॉईज असोसीएशन चे तालुका अध्यक्ष नदीम शकील शेख, व जळगांव जिल्हा सचीव हर्षल हिरालाल पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रफुल पाटील व बंटी पाटील, गौरव चौधरी व गजानन काकडे (आरोग्य सहाय्यक) ग्रामीण रुग्णालय व पाचोरा आदी पोलीस बॉईज उपस्थीत होते.
अशा उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व देशावर, राज्यावर आलेल्या संकटकामी जीवाची पर्वा न करता देशातील जनतेचा जीव वाचविण्यासाठीचे कार्य करणाऱ्या या देशसेवी योध्द्यांचा सत्कार प्रशासकीय पध्दतीने जळगांव जिल्हाधिकारी साहेबांकडून ही व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.