पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला जमा असलेल्या हरवलेल्या मोटार सायकल वाहना मध्ये तुमचे वाहन नाही ना? याबाबत खात्री करा नाही तर ,होणार लिलाल.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०४/२०२१
पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला जमा असलेल्या हरवलेल्या ८ मोटार सायकल वाहना मध्ये तुमचे वाहन नाही ना? याबाबत खात्री करा नाही तर लिलाव होणार
तुमची स्वतःची, मित्रांची, नातेवाईकांची किंवा अन्य कुणाचीही परिसरातील मोटरसायकल हरवली असल्यास ती पिंपळगाव हरेश्वर पोलिसात तर नाही ना? याबाबत खात्री करून घ्या. येथे पडून असलेल्या वाहनांचा पत्ता शोधून ती कायदेशीर त्यांना देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ज्यांची वाहन असतील त्यांनी आवश्यक कागदपत्रे घेऊन १० दिवसांच्या आत येऊन आपले वाहन घेऊन जावे. तसेच जे मुळ मालक मिळवून येणार नाही त्यांच्या वाहनांची परिवहन विभागाकडून आर.टी.ओ.कडून मूल्यांकन करून त्यानंतर नियम व अटी नुसार या वाहनांचा लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक सौ. निताजी कायटे यांनी दिली आहे.
म्हणून येथे पडून असलेल्या वाहनांना मध्ये तुमचे यापूर्वी हरवलेले किंवा मग काही कारणास्तव पिंपळगाव हरेश्वर पोलिसात जमा असलेले वाहन तुमच्या परिसरातील तर नाहीना? याबाबत खात्री करुन घ्या… व ते घेऊन जावे असे आव्हान पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे