कुऱ्हाड खुर्द येथे कोरोना टेस्टमध्ये ३८ पैकी ०८ पॉझिटिव्ह.
दिलीप जैन..(पाचोरा)
दिनांक~२२/०४/२०२१
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द व कुऱ्हाड बुद्रुक येथे दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आजपर्यंत दोघेही गावातुन जवळपास सात कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून बरेच कोरोनाबाधीत ठणठणीत होऊन कोरोनामुक्त झाले आहेत.
मात्र अजूनही सक्रिय संशयित रुग्ण असल्याचे आढळून आले असल्याने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघून ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्या अनुशंगाने दिनांक २२ एप्रिल लोहारा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. देवेंद्र पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी कुऱ्हाड खुर्द येथील ग्रामस्थांची व महिलांची टेस्ट करुन घेतली.
यावेळी ३८ लोकांची तपासणी करण्यात आली पैकी ०८ लोकांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून नागरिकांनी घाबरून न जाता सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे पालन करावे व कुणालाही काही शंका आल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन डॉ. देवेंद्र पाटील. यांनी केले आहे.
या रॅपिड टेस्टिंग लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी मा.श्री. देवेंद्र पाटील. यांनी अथक परिश्रम घेतले तसेच जिल्हापरिषद सदस्य दिपकसिंग राजपूत ,अरुण भाऊ पाटील ,कैलास भगत, कौतीक शिवराम पाटील,दिपक पाटील,रमेश,यांचे विशेष सहकार्य लाभले.