कुऱ्हाड खुर्द व कुऱ्हाड बुद्रुक गावातील अवैधधंदे बंद करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०८/२०२१
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द व कुऱ्हाड बुद्रुक या गाव परिसरात सट्टा, पत्ता, देशी व गावठी दारूची अवैध विक्री दिवसाढवळ्या राजरोसपणे सुरू असल्याने अल्पवयीन व तरुण मुले, जेष्ठ नागरिक व्यसनाच्या आहारी जात असल्याने गावपरिरातून तसेच घराघरातून अशांतता पसरली असून मागील महिन्यात एका १८ वर्षीय तरुणाला जुगाराच्या अड्डा मालकाने धमकी दिल्यामुळे त्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून गावपरिरातून हे अवैधधंदे त्वरित बंद करावे अशी मागणी सुज्ञनागरीक व महिलावर्गाकडून होत आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की कुऱ्हाड खुर्द गावात बसस्थानक परिसर, भरवस्तीत, हमरस्त्यावर तसेच धार्मिक स्थळांजवळ सट्टा बेटिंग व देशी व गावठीदारुची दिवसाढवळ्या खुलेआम विक्री रात्रंदिवस सुरु असून. कुऱ्हाड शिवारात मोठ्या प्रमाणात गावठीदारु निर्मीतीचे अड्डे असून याठिकाणी दिवसाढवळ्या, रांत्रदिवस दारु निर्मिती सुरु असून कुऱ्हाड येथून जवळपासच्या दहा गावांना गावठी दारुचा पुरवठा केला जात आहे.
तसेच गावापासून जवळच एका शेतात कुऱ्हाड व कुऱ्हाड खुर्द व कुऱ्हाड बुद्रुक या गावाला जोडणाऱ्या फरशी पुलाजवळील गारुडी व्यवसाय करणाऱ्या वस्तीच्या बाजूला बाभूळबंद व झाडाझुडुपांमध्ये जुगाराचा अड्डा सुरु आहे. या कारणांमुळे गावातील अल्पवयीन मुले, तरुण वर्ग व जेष्ठ नागरिक सट्टा, पत्ता, दारुच्या आहारी गेल्याने बरीचशी कुटुंब बर्बाद झाली असून काही बर्बादिच्या मार्गावर आहेत. तसेच चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच व्यसनाधीनतेत लहान मुले व तरुणांचा जास्त समावेश असल्याने हा प्रकार चिंताजनक आहे. तसेच व्यसनाधीन लोक आपल्या व्यसनपुर्तीसाठी संसारपयोगी वस्तू, दागदागिने विकून तर स्थावर मालमत्ता गहाण ठेवून हा पैसा व्यसनात उडवतात व यामुळे घराघरात भांडणतंटे होऊन महिलांचा छळ होत असल्याने बरीचशी कुटुंब बरबाद झाली असून काही बरबादीचा मार्गावर आहेत.
(तसेच जुलै महिन्यात कुऱ्हाड तांड्यातील मनोज उर्फ (मोहन) चत्रु जाधव या अठरा वर्षीय मुलागा जुगारात पैसे हारल्यावर जुगाराच्या अड्डा मालकाने त्याचा मोबाईल हिसकावून घेत पैसे मागणीसाठी धमकी दिल्यामुळे मोहन याने धास्ती घेऊन झाडाला दोर बांधून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.)
म्हणून मागील पाच वर्षापासून सुज्ञ नागरिक व महिलांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनपासून डी.वाय.एस.पी, डी.एपी, डी.आय.जी, आमदार खासदार यांच्यापर्यंत तक्रारी करुनही काही एक फायदा होत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे अवैधधंदे करणारांना राजाश्रय मीळतो असा महिलांनी केला असून येत्या पंधरा दिवसात हे अवैध बंद न झाल्यास आम्ही आंदोलन छेडणार असल्याचे सांगितले.
विशेष~मागील पाच वर्षांपासून या गावातील अवैधधंदे कायमस्वरूपी बंद व्हावेत अशी सततची मागणी असल्यावरही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने जनमानसातुन संतप्त भावना व्यक्त केल्या जात असून हे अवैधधंदे नेमके कोणाच्या आर्शिवादाने चालतात व कायद्याचे रक्षक कुणाच्या दबावाखाली कारवाई करत नाहीत किंवा यांचाही छुपा पाठिंबा तर नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे.