समाजकारण, राजकारणाची आवड सोबतच वकिली व्यवसायातून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणारे दिपक पाटील.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०७/२०२२
पाचोरा तालुक्यातील सर्वाचे परिचित असलेले राजकारण व समाजकारणाची आवड सोबतच वकिली पेशातून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणारे एडवोकेट मा. श्री. दिपक पाटील यांचा आज वाढदिवस या वाढदिवसानिमित्त पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार मा. श्री. अनिल आबा येवले यांनी व्यक्त केलेल्या शब्दरूप शुभेच्छा सत्यजित न्यूजच्या माध्यमातून आपणासमोर सादर.
पाचोरा शहरातील कृष्णापुरी भागातील रहिवासी असलेले एडव्होकेट श्री. दीपक पाटील यांचे मूळ गाव वाडी शेवाळे. त्यांचे वडील स्वर्गीय श्री. विठ्ठल चांगो पाटील नगरपालिकेत नोकरी करत होते. त्यांनी नोकरी व शेती दोघे सांभाळून आपल्या परिवाराचा सांभाळ करीत होते. त्यांचे चिरंजीव श्री. दीपक पाटील लहानपणापासून अत्यंत हुशार व चाणाक्ष होते. त्यांनी लहानपणापासूनच कृष्णापूरी भागात आपले चांगले संबंध जोडून सर्वांशी नाळ जोडली तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर पणे भाग घेऊ लागले. कुठलाही धार्मिक कार्यक्रम असला तरी वेळ काढून हजर राहत असे. त्यांनी कधीही जात धर्म गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता सर्वांना आपलेसे करून घेत असून विविध संघटनाशी संबंध ठेवून मैत्रीपूर्ण संबंध ठेऊन समाजकार्यात भाग घेतला.
ते सद्यस्थितीत संघर्ष मित्र मंडळाचे संचालक असून माजी आमदार माननीय श्री. दिलीप भाऊ वाघ यांनी त्यांना राष्ट्रवादी पक्षातर्फे स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त केले असून दिपक पाटील हे पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी कायदेशीर सल्लागार होते व अखिल भारतीय ग्राहक कल्याण फाउंडेशन या संस्थेचे पाचोरा तालुकाध्यक्ष म्हणून सध्या ते काम पाहत आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कायदेशीर सल्लागार आहेत. गेल्या सतरा वर्षांपासून वकील व्यवसाय करत असून त्या माध्यमातून सामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत असून या न्यायालयीन क्षेत्रातील बुध्दिमान, तरुण तडफदार व रुबाबदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.
कायदेविषयक गाढा अभ्यास, न्यायालयीन कामकाज करतांना आपल्या पक्षाची बाजू मांडण्याचे कौशल्याच्या माध्यमातून अनेक किचकट व गहण प्रकरणातून सत्य न्यायालयासमोर व जनतेसमोर आणून सतत असत्याचा पराभव करत भल्यामोठ्यांना न्याय मिळवून दिला असल्याने आज पाचोरा शहर तसेच तालुक्यात दिपक पाटील यांनी आपल्या वकिली व्यवसायात ठसा उमटवून स्वताची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.
तसेच ते जरी वकिली व्यवसाय करत असले तरी हा व्यवसाय करतांना त्यांनी समाजकारणाच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेऊन सर्वसामान्य जनतेला मदत व न्याय मिळवून दिला आहे. हे काम करत असतांना त्यांनी सर्वधर्मसमभाव हा बाणा बाळगून सर्वधर्मीय बांधवांच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, नियोजन व मदत केली आहे. हे सगळे कर्तव्य पार पाडत अभतांना त्यांनी कधीही त्यांनी कोणाचे मन दुखवले नाही.
हे सगळ करत असतांनाच संसाराचा गाडा ओढण्यासाठी चार पैसे कमावण्याच्या हेतूने त्यांनी पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथे एका विश्वसू मित्रासोबत भागिदारी करत शेतकऱ्यांच्या हितासाठी श्री. गुरुकृपा ठिबक नावाने एक व पाचोरा कृष्णापुरी येथे श्री. स्वामी समर्थ ठिबक एजंसीच्या नावाने एक दुकान उघडले असून या ठिबक एजंसीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माफक दरात वस्तू देऊन शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट थांबविण्यासाठी एक छोटासा प्रयत्न करत आहेत.
ते राहत असलेल्या कृष्णापुरी भागात तसेच पाचोरा शहरासह तालुक्यातील कोणावर काही संकट आले तर क्षणाचाही विलंब न करता मदतीसाठी धाऊन जात असतात. स्वभावाने अत्यंत साधे सरळ नेहमी हसतमुख बरेच वर्षे कृष्णापुरी भागात काढल्यामुळे आज ते भडगाव रोड जिजामाता कॉलनी डाक बंगल्याजवळ राहत असून त्यांनी कृष्णापुरी भागातील नागरिकांशी आपले संबंध कायम ठेवून रोज एक वेळा कृष्णापुरी भागात भेटायला येतात. त्यामुळे त्यांचे मित्रमंडळी व चहाते असून त्यांनीही कधीही त्यांना भेटण्यासाठी टाळाटाळ केली नाही. आज प्रभाग क्रमांक ३ व १४ मधून दिपक पाटील यांनी निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्याची इच्छा असून भावी नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
एडवोकेट मा. श्री. दीपक पाटील यांचा वाढदिवस असल्याने या वाढदिवसानिमित्त मी शब्दसुमनांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा प्रयत्न केला आहे.
आपला स्नेहांकित
अनिल आबा येवले.