ॲड.रोहिणीताई खडसेंच्या गाडीवर प्राणघातक हल्ला, जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/१२/२०२१
जळगाव जिल्ह्यात खासकरून मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात सध्या महाविकास आघाडीचे प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सध्या अवैध धंद्यापासून इतर अनेक विषयांवर आरोप-प्रत्यारोपांची जोरदार ठिणगी पडलेली असून आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे.
तसेच आज जळगाव जिल्हा बॅंकेच्या माजी अध्यक्षा रोहीणीताई खडसे खेवलकर या चांगदेव येथुन हळदीनिमित्त कार्यक्रम आटोपुन रात्री ८:३० वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर येथे येत असतांना सुतगिरणी जवळ अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या चारचाकी गाडीच्या काचांवर जोरदार प्राणघातक हल्ला केल्याने जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडालेली आहे.
नेमके हल्लेखोर कोण आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कदाचित शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात अवैध धंदे व इतर इतर विषयावर सुरु असलेल्या तात्विक वादात ठिणगी पाडण्यासाठी कुणीतरी हित शत्रू आपली पोळी भाजून घेण्यासाठी ही खेळी तर खेळला असावा अशी शंका सुज्ञ नागरिक व जाणकारांनी व्यक्त केली आहे.
ॲड रोहिणीताई खडसे या राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या कन्या असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीतील प्रमुख पदाधिकारी आहेत. त्यामुळे काही गेल्या दिवसांपासून मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात सुरू असलेल्या राजकीय सुंदोपसुंदीशी या दगडफेकीच्या घटनेची किनार असण्याची शक्यता आहे का ? या दृष्टीने पोलिस आता कामाला लागलेली आहे. या घटनेवर खडसे परिवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यावर काय प्रतिक्रिया देतो याकडे राज्याचे लक्ष लागून आहेत.
याबाबत पोलिस आपल्या कामाला लागले असून हल्लेखोचा कसून शोध घेत आहेत. पोलिस तपासात सत्य समोर येईलच, परंतु आपल्या जिल्ह्यातील राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे वाटत नव्हते. एका महिला कार्यकर्त्याच्या गाडीवर असा प्राणघातक हल्ला होणे ही जळगाव जिल्ह्यासाठी खेदाची बाब आहे. असे मत जनतेतून व्यक्त केले जात असून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
सविस्तर बातमी उद्या.