गाव करील ते राव काय करील, चिंचपुरे ग्रामपंचायत ठरणार बिनविरोध.
दिलीप जैन (पाचोरा)
दिनांक~३१/१२/२०२०
पाचोरा तालुक्यातील चिंचपुरे गावाची ग्रामपंचायतीची निवडणूक आजपर्यंत कधीही बिनविरोध झालेली नाही. ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून सरळसरळ दोन पॅनल मध्ये लढत व्हायची या लढतीत गावातील लोकांचे आपसात मतभेद वाढणे, छोटी मोठी भांडण आलीच सोबतच आर्थिक खर्च
परंतु यावेळी चिंचपुरे ग्रामस्थांनी या सर्व गोष्टींना सोडचिठ्ठी देत ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरविले व लहानमोठ्यांनी सर्व मतभेद विसरून गावात बैठक घेतली व आपल्या गावाची प्रगती कशी होईल हा एकमेव हेतू डोळ्यासमोर ठेवून थोरामोठ्यांशी सल्लामसलत करून ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी एकमताने खालील सदस्यांची निवड केली या निवडीस गावातील जनतेने सर्वानुमते संमती दर्शविली व वार्डनिहाय ठरल्याप्रमाणे उमेदवारी अर्ज भरतांना ९ जागांसाठी फक्त ९ उमेदवारांचे अर्ज भरून चिंचपुरे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध केली.
यामुळे गावाचा खर्च होणारा पैसा व शासन , प्रशासनावर येणारा तान कमी झाला व गावातील गोडवा टिकून भविष्यात माननीय आमदार साहेब, जिल्हापरिषद सदस्यांनी बिनविरोध निवडणूक लढवणाऱ्या ग्रामपंचायतींना विकासकामासाठी जाहीर केलेल्या निधीतून विकास कामे करून गाव प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्न असतील असे नवनिर्वाचित सदस्यांनी सांगितले.
*वार्ड नं – १*
१) मंगलाबाई अनिल पाटील – जनरल स्त्री
२) प्रदिप जिवराम पवार – OBC पुरुष
३)ज्योतीबाई अजय कुमावत- जनरल स्त्री
*वार्ड नं – २*
१) गणेश उत्तम पवार – SC पुरुष
२) आक्काबाई हुसेन तडवी – ST स्त्री
३) वैशाली आबा पाटील – OBC स्त्री
*वार्ड नं – ३*
1) शरद नाना पाटील – अनारक्षित पुरुष
२) सचिन अनिल पाटील-अनारक्षित
३) गायत्री स्वप्नील देवरे – जनरल स्त्र
चिंचपुरे ग्रामपंचायत तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याबद्दल चिंचपुरे ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक होत आहे.