भातखंडे विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक बी. एन. पाटील. राज्यस्तरीय आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक=१९/११/२०२०
कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या भातखंडे माध्यमिक विद्यालयातील तंत्रस्नेही,उपक्रमशील, शाळेतील जेष्ठ शिक्षक बी एन पाटील यांना नुकताच मुख्य संपादक अस्लम नदाफ,
उपसंपादक श्री उस्मान मुल्ला तळदंगे, प्रसिद्धीप्रमुख सौ.कविता घाडगे प्राईड ऑफ न्यूज चॅनेल कोल्हापूर यांनी त्यांच्या प्रदीर्घ काळातील शैक्षणिक कार्याची विशेष दखल घेऊन राज्यस्तरीय आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार” देऊन सन्मानित केले आहे. त्यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले असून ते भडगाव तालुक्यातील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या भातखंडे माध्यमिक विद्यालयातील जेष्ठ शिक्षक, उपक्रमशील, तंत्रस्नेही शिक्षक आहेत विद्यार्थी हितासाठी सामाजिक, शैक्षणिक विकास व्हावा या दिशेने ते अध्ययन अध्यापन कार्य करीत असतात ,त्यासाठी ते नेहमीच नवनवीन अभिनव उपक्रम राबवत असतात. यात खास करून आपत्कालीन परिस्थितीत कोरोना विषाणू महामारी प्रसंगी कोविड:-१९ काळात आपण समाजापुढे एक आदर्श प्रस्थापित केला पाहिजे. या महामारी प्रसंगी शासनाने निर्देशित केल्यानुसार “शाळा बंद पण शिक्षण चालू” या धोरणानुसार विद्यार्थ्यांसाठी राज्यात लॉक डाउन झाल्यापासूनच विद्यालयात विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून वेगवेगळे अभिनव उपक्रम राबवून त्यांना शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात ठेवण्याचा सातत्याने प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे . त्यांचा मुख्य विषय इंग्रजी हा असून सर्वप्रथम त्यांनी वर्गनिहाय विद्यार्थ्यांचे व्हाट्सअप ग्रुप तयार केलेत त्यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना व्हाट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला . असे असताना काही विद्यार्थ्यांकडे व्हाट्सअप साठीचा अँड्रॉइड मोबाईल नसल्या कारणाने त्यांचे देखील शिक्षण झाले पाहिजे यासाठी त्यांनीं पालकांशी संपर्क साधला ज्यांच्याकडे मोबाईलच नाही ज्या पालक व विद्यार्थ्यांशी वैयक्तिक संपर्क साधून अथवा प्रत्यक्ष फोनवरून बोलून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यासाठी वेगवेगळे शैक्षणिक ॲप्सद्वारे व्हिडिओज पाठविणे तसेच दीक्षा अँप वरून विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास देणे, त्यांचा अभ्यास व्हाट्सअप वर मागून तपासून त्यांना अभिप्राय देणे अधून मधून त्यांना सूचना व्हाट्सअप ग्रुप वरून सूचनेद्वारे होमवर्क देणे, होमवर्क व्हाट्सअपवर टाकायला लावणे त्याच्यात काही अडचणी असल्यास त्या दूर करणे , तसेच गुगल मीटद्वारेअँप द्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ऑनलाइन अभ्यास देणे हे करत असताना परंतु हे करत असताना ग्रामीण भाग असल्यामुळे ग्रामीण भागात नेटवर्क कनेक्टिविटी ची खूपच अडचण असल्यामुळे त्यामुळे गूगल मीट हे ॲप पाहिजे तसे यशस्वी झाले नाही, असे असले तरी हताश आणि निराश न होता व्हाट्सअप ग्रुपच्या द्वारे अथवा अधून-मधून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन इंग्रजीत विषयाबाबत त्यांना व्हिडिओज व्यवस्थित समजतात किंवा नाही त्याच्यातील उच्चार समजतात किंवा नाही होमवर्कची सोडून व्यवस्थित करता येते किंवा नाही त्यावरील इंग्रजी व्याकरण त्यांना पुरेसे आत्मसात होते किंवा नाही या सार्या गोष्टी सोशल डिस्टंसिंगचे पूर्णपणे पालन करून विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे. ऑनलाइन टाकलेला अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने समजतो आहे किंवा नाही हे तपासणे त्यांच्या अडीअडचणी फोन वरून न सुटत असल्यास अशा अडचणीच्या प्रसंगी थोडासा धोका पत्करून परंतु पूर्णपणे सोशल डिस्टंसिंग चे पालन करून सॅनिटायजेशन करून तोंडाला मास्क लावून वाड्या वस्तीत जाऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्यांचे निराकरण करण्याचे काम प्रामाणिकपणे केले, आणि त्याला उत्तम असा प्रतिसाद मिळाला आहे ग्रामीण भाग असला तरी विद्यार्थी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत असतात. सरांचे विद्यार्थी हितासाठी नोकरीत लागल्यापासून त्यांचा वैयक्तिक पालक भेटीवर नेहमीच जोर असतो त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती प्रत्यक्ष भेटल्यानंतर कळत असते या सर्व चहूबाजूंनी कृतिशील कार्य त्यांचे चालूच असते विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वृद्धीसाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात त्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी तंत्रस्नेही कार्यासाठी कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरी पाटील संस्थेचे संचालक प्रशांत राव विनायक पाटील संस्थेच्या सचिव डॉ. पुनमताई प्रशांत पाटील यांचे मार्गदर्शन तर शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाटील यांचे सहकार्य नेहमीच लाभत असते त्यांच्या सर्व कार्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक त्यांना नेहमीच प्रोत्साहित करत असतात त्यांच्या सन्मानाने संस्थेची मान अधिक उंचावली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.