वरखेडी येथील गुरांच्या बाजारात म्हशींच्या खरेदीविक्री ची परवानगी द्यावी पशुधन पालकांची मागणी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/११/२०२२
सद्यस्थितीत सगळीकडे लम्पी आजाराची लागण झाल्यापासून गुरांचे बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच शेळी (बकरी) बाजार भरवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच आजही पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत येणाऱ्या उपबाजार समिती वरखेडी येथील गुरांचा बाजारात शेळ्या वगळता म्हैस, बैल, गायींची खरेदी, विक्री करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नसल्याने जामनेर, पाचोरा, भडगाव, सोयगाव, चाळीसगाव तालुक्यातील पशुधन पालक चिंतीत झाला असून यात गुरांचे व्यापारी, दलाल, गुरे वाहतूक करणारे वाहनमालक, वाहनचालक तसेच या बाजाराशी संबंधित असलेले दोरखंड, शेती साहित्य विक्री करणारे, हॉटेल व्यवसायीक, पानटपरी चालक यांचे व्यवसाय बंद झाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर
निर्माण झाला आहे.
याचेच जिवंत उदाहरण म्हणजे आज दिनांक १० नोव्हेंबर २०२२ गुरुवार रोजी वरखेडी येथील उपबाजार समिती वरखेडीच्या बाजारातील मार्केट यार्डात शेळ्यांच्या बाजाराला परवानगी असल्याने नियमितपणे खरेदी, विक्री सुरु होती. याच बाजारात मात्र गुरांच्या बाजारात म्हैस व गोवंश जनावरे विक्रीसाठी बंदी असल्यावर ही पशुधन पालकांनी मोठ्या प्रमाणात म्हशी विक्रीसाठी आणल्या होत्या म्हणून बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी म्हशी घेऊन पशुधन पालकांना बाजार समितीच्या आवारात येण्यासाठी मज्जाव केला असता पशुधन पालक, व्यापारी व दलालांनी बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांशी वाद घातला तसेच बाजारात विक्रीसाठी आणलेल्या म्हशी व वाहने वरखेडी ते पाचोरा दरम्यान बाजार समितीच्या प्रवेशव्दाराच्या समोर रस्त्यावर उभी करुन तेथेच बाजार भरवून म्हशींची खरेदी, विक्री सुरु केल्यामुळे वाहतूकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता.
वरखेडी गुरांच्या बाजारासमोर एकच गर्दी झाली असून वाहत केस अडथळा निर्माण झाला आहे असे पिंपळगाव पोलिसांना माहित पडतातच पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्र वाघमारे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह वरखेडी येथे येऊन शेतकऱ्यांना समजून सांगत रहदारी साठी रस्ता मोकळा करुन देत जिल्हाधिकारी यांचा आदेश येईपर्यंत कुणीही बाजारात म्हशी किंवा इतर पशुधन विक्रीसाठी आणू नये असे समजून सांगितले.
(पशुधन पालकांची मागणी.)
परंतु पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या मते व अहवालानुसार लम्पी हा आजार फक्त गोवंश म्हणजे गाय, बैल, वासरांनाच झाल्याचे आढळून आले असून आजपर्यंत म्हैस किंवा शेळ्यांना या आजाराची लागण झाल्याचे आढळून आले नसल्याने शेळींच्या बाजारा सोबतच म्हशीच्या बाजाराला परवानगी दिली तर काही एक अपाय होणार नाही अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकारी मा. श्री. दिलीप शिंपी यांनी दिली असल्याने निदान शेळी व म्हैस बाजार त्वरित सुरू करण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे.