दिलीप जैन.(पाचोरा)
पाचोरा~२१/१२/२०२२

संपले इलेक्शन जपा रिलेशन, संतोष पाटील.
———————————————————–
देशाच्या विकासासाठी व सामाजिक एकात्मता वाढीसाठी, गाव खेड्यातून शहरापर्यंत विकास साधण्यासाठी स्वराज्य संस्था महत्त्वाचं काम करतात, त्यामध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे ग्राम पंचायत ग्रामीण महाराष्ट्राचा ग्रामीण देशाचा गाव खेड्यात राहणाऱ्या समस्त गावकऱ्यांच्या विकासाचे केंद्रबिंदू म्हणजे ग्रामपंचायत, या माध्यमातून गावातील मूलभूत गरजा तसेच विकास कामं, त्या जोडीने कायदा सुव्यवस्था, सरकारी असंख्य योजना गोरगरिबापर्यंत पोहोचवता येतात अगणित असे काम या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी आपण करू शकतो, हे सगळं करण्यासाठी संविधानाने लोकशाहीच्या मार्गाने निवडणूक लढवून आपल्याला निवडून येण्याचा अधिकार दिलेला आहे, आपण चांगल्या पद्धतीने विकास कामाच्या मुद्द्यांवर बोलून विकासाचा अजेंडा मांडून निवडणूक लढू शकतो आणि जिंकून येऊ शकतो मात्र सध्याची परिस्थिती बदलली आहे, मतदानासाठी साम-दाम-दंड-भेद या गोष्टींचा वापर सुरू झाला आहे, लोकशाही बाजूला सारून हुकूमशाही वापरली जाते आहे त्यामध्ये आमदार खासदार राजकीय पुढारी गाव खेड्यामध्ये भाग घेऊ लागले आहेत, यामुळे गावातील वातावरण दूषित झालेले आहे गावातील भावकी, नातं गोत, मित्रपरिवार या सगळ्या गोष्टी या निवडणुकांमुळे कुलुशीत झालेली आहेत, काही ठिकाणी कार्यकर्ते आक्रमक होऊ एकमेकांची डोके फोडताना दिसून येत आहेत खरं म्हणजे या निवडणुका ही ग्रामपंचायत गावाच्या विकासासाठी असते, गावातील जन सामान्यांचा विकास झाला पाहिजे अशी या मागची भूमिका असते मात्र तसे होताना दिसत नाही, एकमेकांची जिरवण्याच्या नादात समस्त गावाचा विकास मंदावला जातो खऱ्या कार्यकर्त्याच्या काम करणाऱ्या माणसाच्या हातात सत्ता जात नाही, तालुक्यावरील राजकीय पक्ष गावातील कार्यकर्त्यांना हातचं करून एकमेकांमध्ये वाद पेटवून इर्षा लावून त्यांना पेटवून आपली स्वतःची पोळी शेकून घेतात आणि आपल्या गाव गाड्यांचा विकास तसाच राहतो, मित्रहो मला एक गोष्ट आज ही खटकते आहे देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे झाली तेव्हापासून आतापर्यंत बऱ्याच गावांमध्ये साधी प्यायच्या पाण्याची व्यवस्था नाही रस्ते लाइट्स गटारी या गोष्टीचा दूरच राहिल्या हे सगळं या इर्षाच्या राजकारणामुळे झालं, त्या काळात महात्मा गांधींनी सांगितलं होतं खेड्याकडे चला तो विचार खूप सुंदर होता शाश्वत होता मात्र कुठे काय झालं, गाव खेड्याकडून सगळ्याच गोष्टी शहरापर्यंत जातात इतकंच नव्हे तर सगळेच नेते जवळ जवळ गावातून शहराकडे गेलेले आहेत, मात्र या लोकांनी शहरा कडून विकास गावाकडे येऊ दिला नाही त्याला कारण फक्त आपण आहोत, असो आता ग्रामपंचायत इलेक्शन संपलेल आहे कपड्यावर पडलेला गुलाल झटकून टाका आणि आपल्या विजयाचा उन्माद बाजूला सारून खेळकर वृत्तीने आपल्या पराभूत झालेल्या प्रतिस्पर्ध्याला मिठीत घ्या विश्वासात घ्या आणि गावाच्या विकासाची वाट सुकर व सूनिश्चित करा
यातच आपलं हित सामावलेला आहे..

संतोष पाटील
7666447112