मानसिंगका कॉर्नर जवळ भररस्त्यावर असणारी दुकाने धोकादायक.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०३/२०२१
पाचोरा शहरातील मानसिंगका कॉर्नर हा रहदारीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा कॉर्नर आहे. कारण जारगाव चौफुली, बसस्थानक पासून पाचोरा शहरात येणारा रस्ता महत्वाचा व मुख्य रहदारीचा रस्ता आहे.
कारण या रस्त्यावरुन जारगाव चौफुली मार्गे जवळपास विस खेड्यातील लोक दैनंदिन कामानिमित्त पाचोरा शहरात आपपल्या वाहनाने किंवा बसस्थानकातून रिक्षाने शहरात येतात. तसेच या रस्ता रुंद असल्याने मालवाहतूक वाहने याच रस्त्यावरून येत जात असल्याने मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. परंतु मानसिंगका कॉर्नर जवळ ऐन कॉर्नरवर काही व्यवसाईक आपली दुकाने लावत असल्याने या दुकानावर ग्राहकांची गर्दी असते.
या कारणांमुळे जारगाव कडून शहरात येणाऱ्या वाहनांना तसेच शहरातुन बाहेर जाणाऱ्या वाहन चालकांना या कॉर्नरवर गर्दी असल्याने समोरुन येणारे वाहन लवकर दिसत नाही. म्हणून वाहनांची समोरासमोर येऊन धडक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कारणास्तव एखाद्या वेळेस मोठा अपघात होण्याची भीती असल्याने या कॉर्नरवर बसणारी दुकाने दुसरीकडे हलवण्यात यावेत अशी मागणी वाहनधारक, रिक्षाचालक व दुचाकी स्वारांकडून केली जात आहे.