माणुसकी समूहातर्फे स्वामी विवेकानंद, व राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती साजरी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनाक~१२/०१/२०२१
लोहारा तालुका पाचोरा येथे माणुसकी समूहातर्फे सुर्वे वाचनालय मध्ये स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रास्ताविक मध्ये माणुसकी ग्रुप अध्यक्ष समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनी स्वामी विवेकानंद राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या चरित्रावर माहिती दिली. व खरच आपण महापुरुषांचे चांगले संस्कार आपण युवकांनी अंगीकारले पाहिजे असे मत व्यक्त केले. गुणवंत शिरसागर यांनीही स्वामी विवेकानंद यांचे विषयी माहिती विशद केली. यावेळी कवी मंगलदास मोरे विलास निकम बापू पाटील रमेश कोठारी रामदास भोलाने ईश्वर भोलाने नंदू सुर्वे विजय चौधरी आबा गोंधळे रतन चव्हाण नागो भिल नंदु चव्हाण नवल जाधव शशिकांत गीते चंद्रकांत गीते इत्यादी माणुसकी ग्रुप सदस्य व गावकरी मंडळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनी केले व आभार प्रदर्शन गुणवंत क्षीरसागर यांनी केले.