थोरा मोठ्यांना सोबत घेऊन गाव विकासासाठी पुन्हा जनमताचा कौल मागणार. प.स.सदस्य ज्ञानेश्वर सोनार.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/१२/२०२०
महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या निवडणूकींचा बिगुल वाजला असून सगळीकडे निवडणूकींची तयारी सुरु आहे.
मग यात पाचोरा तालुक्यातील वरखेडी गाव मागे कसे रहाणार म्हणून
वरखेडी येथील पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर सोनार यांनी ग्राम पंचायतीच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचाली सुरू केल्या आहेत.
वरखेडी गावात समोरासमोर दोन गटात सरळसरळ लढत होण्याची चिन्हे दिसत असून गावात राजकीय वारे जोरात वाहत आहेत.
ग्रामपंचायतीच्या निवडणूकीबाबत पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर सोनार यांची भेट घेऊन मत जाणून घेतले असता
मी सरपंच व सदस्यांना सोबत घेऊन त्यांच्या सहकार्याने गावात ,रस्ते ,पेव्हर ब्लॉक,काँक्रीटीकरण,शॉपिंग कॉम्प्लेक्स,गटारी ,समाजमंदिर अंगणवाड्या,दुरुस्ती पथदिवे,व पाणीपुरवठा योजना आरोग्य सेवा(covid) वगैरे लाखो रुपयांची कामे केली आहेत. म्हणून जनता दरबारात थोरा मोठ्यांना सोबत घेऊन गाव विकासासाठी पुंन्हा जनमताचा कौल मागणार असल्याचे सूतोवाच केले आहे.