जळगाव जिल्हा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पुरग्रस्तांना मदत रवाना.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/०७/२०२१
कोकणातील महाड, चिपळूण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर इथे गेल्या आठवडा भरापासून आलेल्या महापुराने मोठे नुकसान केले आहे.
यात वित्तहानी सह जीवितहानी ही मोठ्या प्रमाणात झाली आहे. अनेकांना आपला जीव याठिकाणी गमवावा लागला आहे. शेतकरी बांधवानी देखील आपली जनावरे गमावली. अशा चहूबाजूनी असलेल्या संकटाचा सामना आपले बांधव करीत आहे.
या पूरग्रस्तांना सावरण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने “एक हात कर्तव्याचा, एक हात मदतीचा” असे आवाहन करीत खारीचा वाटा उचलला आहे.
या उद्ध्वस्त संसारांना सावरण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा. प्रवीण भाऊ सपकाळे यांच्या मार्गदर्शनाने दिपकभाऊ सपकाळे, प्रमोदभाऊ सोनवणे, चेतन निंबोळकर, शरददादा कुलकर्णी, भूषणभाऊ महाजन, हेमंतभाऊ सोनार हे जीवनावश्यक वस्तूं, आरोग्यासाठी गोळ्या व औषधंसह एक ट्रक घेऊन कोकणाच्या दिशेने आज रवाना झाले.
याप्रसंगी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीणजी मुंडे यांनी भेट देऊन केलेल्या कामाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.