कळमसरा गावात गावठी डुकरांच्या हल्यात गाय जबर जखमी पांडव कुंटूब हतबल
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/११/२०२९
पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथे गावात गावठी डुकरांची संख्या मोठ्या प्रमाणात असून या डुकरांचा बंदोबस्त करावा म्हणून ग्रामस्थांनी वारंवार आवाज उठवला मात्र डुकरांचा मालक हा ऐकत नसल्याने सर्वच हतबल झाले आहेत.
यातच दिनांक २९ नोव्हेंबरच्या रात्री कळमसरा येथील पांडव यांच्या गायीवर गावठी डुकरांनी हल्ला चढवला व या हल्यात गाय मोठ्या प्रमाणात जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.
ही बातमी कळताच कळमसरा गावातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून या गावठी डुकरांचा त्वरित बंदोबस्त करावा अन्यथा ही डुकरे लहान मुलांवर हल्ला करतील अशी भिती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
ही घटना माहित पडताच कळमसरा येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या सौ.वंदनाताई पाटील. यांनी घटनास्थळी जाऊन पांडव कुटुंबीयांची भेट घेतली व सत्यता जाणून घेतली. तसेच या कुटुंबाला शासनस्तरावरुन आर्थिक मदत मिळावी तसेच आमचे गाव हागणदारीमुक्तीकडे वाटचाल करत असल्याने गावातील डुकरांचा नायनाट करावा अशी मागणी केली आहे.