पाचोरा येथील शकील शेख सह जळगाव जिल्ह्यातील ११ जणांना पोलीस महासंचालक पदक जाहीर.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०४/२०२४
महाराष्ट्रातील पोलीस विभागात उन, वारा, पाऊस, रात्र, दिवस याची तमा न बाळगता सणासुदीच्या काळात घरापासून, कुटुंबापासून लांब राहून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली इमानेइतबारे उत्तम कामगिरी केल्याची दखल घेऊन राज्य शासनाच्या गृहविभागाच्या पोलीस महासंचालक रश्मीजी शुक्ला यांनी राज्यातील पोलीस अधीक्षक व कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हाची घोषणा केली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील ११ जणांना समावेश असून विशेष बाब म्हणजे पाचोरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील शकिल अहमद शब्बीर शेख यांचा समावेश आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र पोलीस विभागातील उत्तम कामगिरी केल्याबद्दल पोलीस महासंचालक रश्मीजी शुक्ला यांनी महाराष्ट्रातील पोलीस अधीक्षक व कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हाची घोषणा केली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील ११ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असून पाचोरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील शकिल अहमद शब्बीर शेख यांचा समावेश आहे.
तसेच जळगाव पोलीस दलातील संजय नारायण हिवरकर, मीनल श्रीकांत साकळीकर, राजेश पंडित पाटील, दीपक देवराम चौधरी, विजय नामदेव सोनवणे, प्रवीणा गजानन जाधव, महेश अरविंद बागुल, मोहम्मदअली सत्तारअली सैयद, शकिल अहमद शब्बीर शेख, संजय राजाराम पाटील, राजेश शाहू पाटील यांचा समावेश आहे.
शकिल अहमद शब्बीर शेख यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.