वडगाव आंबे वि. का. सोच्या चेअरमन पदी राजेंद्र पाटील तर व्हाइस चेअरमन पदी प्रेमसिंग चव्हाण.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०४/२०२४
पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हाइस चेअरमन पदाची निवड दिनांक १० एप्रिल २०२४ बुधवार रोजी नुकतीच घेण्यात आली यात सर्व सदस्यांच्या एकमताने चेअरमन पदी मा. श्री. राजेंद्र सुकलाल पाटील तर व्हाइस चेअरमन पदी मा. श्री. प्रेमसिंग मुलचंद चव्हाण यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
या निवडीच्या वेळी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सदस्य मा. श्री. संजय प्रभाकर पाटील, मा. श्री. अनिल राजाराम राठोड, मा. श्री. अविनाश पंडित निकम, मा. श्री. भुमेंद्रसिंग भिमसिंग राठोड, मा. श्री. वामन लक्ष्मण हाटकर, मा. श्री. शिवदास पदम चव्हाण, मा. श्री. गुणवंत ओंकार मराठे, मा. श्री. विकास रतन पवार, मा. श्री. गबरु मांगो चव्हाण, सौ. संगीता प्रवीण चव्हाण, सौ. लिलाबाई उत्तम राठोड हजर होते. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.