पाचोरा येथे युवकांनी सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत घेतला उ. बा. ठा. सेनेचा झेंडा हाती.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/१०/२०२३

पाचोरा तालुक्याच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या जेष्ठ नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी मागील महिन्यापासून “होऊ द्या चर्चा” हा उपक्रम गाव, खेड्यात राबवून केंद्र व राज्य सरकारने केलेले व चालवलेले कारनामे तसेच सरकार चालवतांना जनतेशी सुरु केलेला भुल, भुलैयाचा खेळ याचा भांडाफोड करत सरकार जे बोलतोय ते करत नाही व फायदेशीर नाही ते काम करुन जनतेला फसवत असल्याचे पटवून दिले. या “होऊ द्या चर्चा” उपक्रमांतर्गत बरेचसे तरुण, वयस्कर व जेष्ठ, श्रेष्ठ नागरिकांचा महाराष्ट्र राज्यात सत्तेत असलेल्या सरकार विरुद्ध मतप्रवाह तयार झाल्याने व उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या विचारांनी प्रेरित होऊन सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्यासोबत रहणे पसंत केले आहे.

याच विचारांनी प्रेरित होऊन आज पाचोरा तालुक्यातील कोल्हे, भोकरी, शिंदाड, सार्वे पिंप्री येथील मंगेश तडवी, गोलू लोहार, संतोष पाटील, रवी पाटील, रहमान तडवी, बाबुराव पाटील, चेतन दळवी, अशोक पाटील, ईश्वर माळी, अनुदिन तळवे, लुकमान तळवे, बबलू मांडवी, आमीन तडवी, शाहरुख तडवी, संजय जाधव संतोष पाटील, शिवाजी गोपाळ, गोपाळ पाटील, शाहरुख तळवी, अमोल तळवी, चेतन तळवी, योगेश सावळे, अफसर कहाकर, अरफाक कहाकर, सरफजखा कहाकर, तौसीफ कहाकर, अनाज कहाकर, जाकीर कहाकर, अजीम कहाकर, अफसर कहाकर, निलेश साठे, सागर चौधरी, तुषार भोई, सुनील भोई, नयन भोई, मनोज भोई, विनोद भोई, दीपक बागुल, समीर तळवी, अलाउद्दीन तडवी आदी शेकडो नवयुवक व तरुणांनी स्वताहून पाचोरा येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात येऊन सौ. वैशालीताई यांच्या उपस्थितीत उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेचा भगवा रुमाल गळ्यात घालून भगवा झेंडा हाती घेत उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेत प्रवेश करत सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील काम करण्याची शपथ घेतली.

या प्रसंगी नवीन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी नवीन सदस्यांचे मनापासून अभिनंदन करत सांगितले की आपल्याला ८०% समाजकारण व २०% राजकारण हा महामंत्र ध्यानी घेऊन गोरगरीब, मायबाप जनतेची सेवा करायची आहे. याकरिता तुम्ही आजपासून नव्हे तर या क्षणापासून कामाला लागा व आपापल्या गाव, परिसरातील गरजूंना स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळत नसेल तर का मिळत नाही हे समजून घेत त्यांना रेशनकार्ड काढून देण्यासाठी मदत करा. तसेच मोफत औषधोपचार, दिव्यांगाना त्यांच्या सवलती मिळवून देण्यासाठी, विधवा, घटस्फोटीत महिलांच्या योजना, श्रावणबाळ निराधार योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा. मतदार नोंदणी करुन घ्या व जनता जनार्दनाच्या समस्या सोडविण्यासाठी तथा त्यांच्या सुखदुःखाची जाणीव ठेवून त्यात सहभागी व्हा माझा पक्ष व मी सदैव तुमच्या पाठीशी आहोत रात्री, बेरात्री काहीही अडचण असल्यास शिवसेनेचे शिवतीर्थ कार्यालयात तुमच्यासाठी उपलब्ध आहे.
असे सांगून तरुणांनी व्यसनापासून दूर राहून निरोगी व आनंदी जीवन जगा असे सांगून नूतन सदस्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दीपकसिंग राजपूत, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख अरुण भाऊ पाटील यांनी मार्गदर्शन केले. तालुकाप्रमुख शरद पाटील, पप्पू राजपूत, भरत खंडेलवाल, शशी पाटील, धनराज पाटील, भगवान पाटील, अरुण तांबे, रितेश जैन, दीपक पाटील, गौरव पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, गणेश पाटील, संदीप पाटील, किरण राजपूत, प्रशांत राजपूत, शुभम महाजन, उमेश राजपूत, निलेश पाटील, डीडी नाना, राजीव गायकवाड, धरमसिंग पाटील, गोकुल गांगुर्डे, आदी मान्यवर उपस्थित होते प्रस्ताविक संचालन आभार नाना वाघ यांनी केले.

ब्रेकिंग बातम्या