ग्रामविकास मंडळाच्या निवडणुकीत मतदान केंद्रावर सावळा गोंधळ, मते मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/१०/२०२२
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्र्वर येथील ग्रामविकास मंडळाची त्रिवार्षीक निवडणूकीसाठी आज दिनांक १६ ऑक्टोबर २०२२ रविवार रोजी कै. हरिभाऊ गोविंदराव देशपांडे सभागृहात सकाळी साडेआठ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असून आता बातमी लिहून होईपर्यंत २५५ मतदात्यांनी मतदान केले आहे.
या निवडणुकीत सरळ, सरळ ग्रामविकास मंडळ बचाव पॅनल व विकास पॅनल या दोन पॅनलमध्ये निवडणूक लढवली जात असलीतरी अध्यक्ष पदासाठी एकुण तीन उमेदवार उभे असल्याने सगळेच आपल्या पारड्यात मत मिळवून घेण्यासाठी पराकोटीचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे आजपर्यंत या संस्थेच्या बऱ्याचशा त्रिवार्षिक निवडणूका झाल्या आहेत मात्र या त्रिवार्षिक निवडणुकीत कमालीचा संघर्ष दिसून येत आहे.
विशेष म्हणजे या निवडणुकीत मते मिळवून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असल्याचे खात्रीलायक वृत्त सत्यजित न्यूजच्या हाती लागले असून यात उमेदवार व मतदार यांच्यातील भ्रमणध्वनीवर झालेल्या संभाषणाच्या काही ध्वनी फीती हाती लागल्या असून त्या संभाषणात अक्षरशा सौदेबाजी केली जात आहे. ही बाब लोकशाहीसाठी घातक असलीतरी हा प्रकार सुरु आहे.
यामुळे मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे सायंकाळी चुरशीच्या चढाओढीत काय होईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असल्याचे दिसून येते आहे. मात्र पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांनी मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवला आहे.