माणुसकी रुग्णसेवा समूहातर्फे लोहारा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
ऐदिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक=१५/११/२०२०
माणुसकी रुग्ण सेवा समुहातर्फे समाजसेवक गजानन क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्ताने दिनांक १६ नोव्हेंबर सोमवरी लोहारा येथील जिल्हापरिषद मराठी मुलांच्या शाळेत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी राहुल पोलीस निरीक्षक पहूर पोलिस स्टेशनचे राहूल खताळ साहेब, ह.भ.प. ईश्वर महाराज पाळधीकर व डॉक्टर सागरदादा गरुड,डॉक्टर भूषणदादा गरुड विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल चे संचालक समाजसेवक सुमित पंडित उपस्थित राहणार आहे. जळगाव जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते व कार्यकर्ते, मीत्र मंडळी यांनी माणुसकी समूहातर्फेआयोजित महारक्तदान शिबिरात रक्तदान करून आपला सहभाग नोंदवून सहकार्य करावे असे आव्हान माणुसकी समुहातर्फे करण्यात येत आहे.
(कोविड च्या प्रादुर्भावामुळे रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी ०८ ते दुपारी ०१ पर्यंत रक्तदान शिबिर चालू राहणार आहे असे माणुसकी ग्रुप जळगाव जिल्हा अध्यक्ष गजानन क्षिरसागर यांनी कळवीले आहे.)