दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/१२/२०२२

पाचोरा येथील देशमुख वाडी परिसरातून दिनांक १७ डिसेंबर २०२२ शनिवार रात्री ते १८ डिसेंबर २०२२ सकाळी सहा वाजेच्या दरम्यान एक फोटोग्राफर व्यवसायीकाची दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा येथील देशमुख वाडी परिसरातील वेदांत हॉस्पिटलच्या मागील बाजूस व नगरसेवक मा. श्री. संजयजी गोहिल यांच्या घराशेजारी मयूर नाथांनी रहातात. यांचा फोटोग्राफी व्यवसाय असून ते दिनांक १७ डिसेंबर २०२२ शनिवार रोजी फोटोग्राफी व्यवसायानिमित्त बाहेर गेले होते. रात्री घरी परतल्यानंतर त्यांनी नियमितप्रमाणे स्वमालकीची दुचाकी फॅशन प्रो. गाडी क्रमांक एम. एच. १९ बी. आर. ७०६६ ही मोटारसायकल घरासमोर उभी करुन ते घरात गेले.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर घराच्या बाहेर आल्यानंतर त्यांना त्यांची मोटारसायकल जागेवर आढळून आली नाही. म्हणून त्यांनी देशमुख वाडी परिसरातील सर्व गल्लीबोळात फिरुन मोटारसायकल कुठे आढळून येते का म्हणून शोधाशोध केली मात्र त्यांची मोटारसायकल कुठेही आढळून न आल्यामुळे आपली गाडी चोरीला गेल्याचा संशय व्यक्त केला असून ते अजूनही चोरीला गेलेल्या मोटारसायकलचा शोध घेत असून उद्या सकाळी ते पाचोरा पोलीस स्टेशनला रितसर तक्रार दाखल करणार आहेत.

तसेच वरील नंबरची व वर्णनाची मोटारसायकल कुणाला आढळून आल्यास मयूर नाथांनी ९६६५२१३६७६ व विकी पाटील ७६६६१०१७९३ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले असून माहिती देणारास ५१००/०० रोख बक्षीस देण्यात येईल व नाव गुप्त ठेवण्यात येईल असे सांगितले आहे.