कुऱ्हाड खुर्द गावात अवैध धंदे करणारे मस्तावले, कायद्याचे रक्षक व ग्रामस्थ धास्तावले.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०१/२०२४
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिंदाड, कुऱ्हाड, लोहारा, वरखेडी, कळमसरा या मोठ्या लोकसंख्येच्या गावात सट्टा, पत्ता, जुगार, गावठी दारुची निर्मिती व विक्री तसेच देशी विदेशी दारुची खुलेआम विक्री केली जात आहे. याबाबत वारंवार आवाज उठवला तरीही काहीएक फायदा होत नसून दर दिवसाला हे अवैध धंदे करणारांच्या संख्येत कमालीची वाढ होतांना दिसून येत असून या अवैध धंद्यांबाबत गावागावातून वारंवार अर्जफाटे करुनही सट्टा, पत्ता, जुगार, दारु व आता नवीनच ऑनलाईन सट्टा हे अवैध धंदे बंद होत नाहीत यामुळे गावागावातून अशांतता पसरली असून अल्पवयीन मुलांसह जेष्ठ नागरिक व तरुण वर्ग व्यसनाधीन होत चालला आहे. यामागील कारण जाणून घेतले असता या अवैध धंदे करणारांना काही ठिकाणी स्थानिक प्रतिष्ठीत तसेच आपापल्या कार्यकर्त्यांना पोसण्यासाठी काही राजकीय मंडळी पाठबळ देत असल्यामुळे हे अवैध धंदे राजरोसपणे सुरु असून या अवैध धंदे करणारांना एक प्रकारे माज आला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिंदाड, वरखेडी, कळमसरा, कुऱ्हाड या गावातून मोठ्या प्रमाणात गावठी दारुची निर्मिती केली जाते व या ठिकाणाहून आसपासच्या गावांना मोठ्या प्रमाणात गावठी दारुचा पुरवठा केला जातो. यामुळे गावागावातून अशांतता निर्माण झाली आहे. तसेच व्यसनाधीनता दिवसेंदिवस वाढत असल्याने बरेचसे संसार उद्धवस्त होत आहेत. सट्टा पत्ता, जुगार, गावठी दारुची निर्मिती व विक्री तसेच देशी, विदेशी दारुची विक्री हे अवैध धंदे बंद करण्यासाठी गावागावातून बऱ्याच वेळा अर्जफाटे करुनही हे अवैध धंदे बंद होत नसल्याने अवैध धंदे करणारांची हिम्मत वाढली असून अर्जफाटे करणारांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्या दिल्या जातात किंवा थेट समोरासमोर हमरीतुमरीवर करत आम्ही हप्ते देतो आमच कुणीही वाकड करु शकत नाही अशी भाषा वापरली जात असल्याने आता तक्रारदार घाबरले आहेत.
************************************************************
अवैध धंदे करणारा कडून उघड उघड चॅलेंज.
************************************************************
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथील एका अवैध धंदे करणाऱ्या इसमाने (कुऱ्हाड बातमी परिसर) व्हाट्सअप गृपवर दारु कुणाच्या बापाने बंद होणार नाही असे खुलेआम चॅलेंज केले आहे. यावरुन एकाबाजूला कुऱ्हाड खुर्द गावातील सरपंच सदस्य तसेच सर्वात जबाबदार घटक म्हणजे पोलीस पाटील यांच्या कार्यप्रणालीवर अकार्यक्षमता उघड होते तर दुसरीकडे सर्वसामान्य जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून महिलावर्ग कमालीचा त्रस्त झाला आहे.