जयदीप पाटील समाजसेवक पुरस्काराने सन्मानित.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/१२/२०२२
पाचोरा मुक्ताई बहुउद्देशीय संस्था व जनमत प्रतिष्ठान जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने पाचोरा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक (मिठाबाई) कन्या विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक जयदीप आनंदा पाटील यांना समाजसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मानाचा फेटा, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
दिनांक २६ डिसेंबर २०२२ सोमवार रोजी जळगाव येथे करियर गायडन्स सेमिनार निमित्ताने राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी श्री जयदीप पाटील यांना “समाजसेवक” पुरस्काराने गौरविण्यात आले. या सोहळ्याला जळगावच्या महापौर जयश्रीताई महाजन, माजी महापौर सीमाताई भोळे, ज्येष्ठ नेते संजय दादा गरुड, ग स पतपेढीचे संचालक व शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार, मुख्याध्यापिका प्रतीक्षा पाटील, वक्ते सचिन देवरे, राळेगण सिद्धी येथील रामानंद वारके, तसेच जिल्हा उद्योग केंद्र नाशिक येथील प्रकल्प अधिकारी आनंद विद्याधर, नगरसेविका नीताताई सोनवणे, इकरा शिक्षण संस्थेचे संचालक मुक्तार सालार, व कीर्तनकार माई साहेब महाराज उपस्थित होते.
श्री जयदीप पाटील यांनी त्यांच्या सुविद्य पत्नी नूतन पाटील यांचे सह “समाजसेवक” पुरस्कार स्वीकारला. गिरड (ता. भडगाव) येथील रहिवासी असलेले जयदीप पाटील सर यांचे ग्रामीण जनजीवन, शेती व शिक्षण विषयात मोलाचे योगदान आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून समाजसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जयदीप पाटील सरांचे सर्व थरातून कौतुक होत आहे.