ललवानी फाउंडेशन तर्फे स्व. तारादेवी ललवाणी यांच्या प्रतिमेचे अनावरण व कुंभारी कृषी पर्यटन केंद्राला महिलांची भेट.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०५/२०२३
भुसावळ येथील ललवाणी फाउंडेशन या संस्थेतर्फे फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी यांच्या मातोश्री स्व. तारादेवी ललवाणी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे अनावरण ललवाणी परिवाराचे अध्वर्यू मा. श्री मदनलाल ललवाणी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी नलिन ललवाणी, सौ. मनीषा कर्नावट, मानस ललवाणी, ललवाणी परिवारातील सदस्य व बहुसंख्य महिला वर्ग उपस्थित होता.
स्व. तारादेवी ललवाणी यांच्या प्रतिमेचे अनावरण केल्यानंतर ललवाणी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी यांनी स्व. तारादेवी यांच्या त्यागमय व समाजसेवी जीवनातील काही आठवणी कथन केल्या तसेच स्व. तारादेवी ललवाणी यांनी समाजासाठी केलेली कामे व इतर आठवणींना उजाळा देत काही प्रसंग सांगितले याप्रसंगी त्यांचा आठवणीने उपस्थितांचे डोळे पाणावले होते.
प्रतिमेचा अनावरण सोहळा आटोपल्यावर या सोहळ्याला उपस्थित असलेल्या सर्वधर्मीय पन्नास महिलांसाठी ललवाणी फाउंडेशनच्या उपाध्यक्ष ध्यक्षा सौ. शोभाजी ललवाणी यांनी माहेरचा, आहेर या कार्यक्रमाअंतर्गत सहलीचे आयोजन करत कुंभारी येथील जगात भारी कृषी पर्यटन स्थळाला भेट देत महिलांचे विविध खेळ, अंताक्षरी स्पर्धा, सफारी, रेन डान्स, गित गायन स्पर्धा अश्या विविध स्पर्धा घेत तसेच घोडा सवारी, बैलगाडी सफरवर जंगलात सफर करत सहलीचा मनमुरादपणे आनंद लुटला विशेष म्हणजे या कार्यक्रमात केंद्राचे संचालक मा. श्री. प्रभाकर साळवे व सौ. ज्योती साळवे यांनी हिरीरीने सहभागी होऊन महिलांच्या आनंदात भर घातली.
तसेच छत्रपती संभाजीनगर येथील ज्युनिअर भाऊ कदम यांनी विविध प्रकारे मीमीक्री करून महिलांचे मनोरंजन केले. प्रभाकर साळवे यांनी अनेक रोगांवरील औषधोपचाराची माहिती दिली. त्याचप्रमाणे खेड्याकडे चला या उक्तीप्रमाणे व तसेच कृषी क्षेत्रातील अनेक बाबी समजून सांगत बारा बलुतेदार ही संकल्पना समजून सांगितली.
विशेष म्हणजे माहेरचा, आहेर या कार्यक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेतील सहभागी महिलांसाठी ललवाणी फाउंडेशनच्या सहभागी महिलांपैकी स्पर्धेत विजयी झालेल्या सौ. मयुरी राहुल संचेती यांना दोन ग्रॅम सोन्याची अंगठी व वंदना ढाके यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. तदनंतर गावरान तुपात बनवलेली बट्टी व भाजीचे सहभोजन केले.
हिंदू संस्कृतीनुसार या कार्यक्रमाचे शेवटी महिलांना हळदीकुंकू देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. ललवाणी फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी हा कार्यक्रम आयोजित करुन चुल आणि मुल यात अडकलेल्या महिलांसाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केला व महिलांना आनंद लुटता आला याबद्दल मंगला कोटेचा यांनी कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन याबाबत तोंडभरुन कौतुक करत आभार मानले.
या कार्यक्रमात सौ. कल्पना गादिया, सौ. लता सिसोदिया, सौ, जयश्री बोथरा, सौ. संगिता मुगदिया, सौ. संगिता मंडलेचा, सौ. कल्पना नाहार, सौ. आशा मगरे, सौ. वैशाली मुन, सौ. रिटा छेडा, सौ. पुनम कोळी, सौ. कविता डोंगरे, सौ. दिपा गादिया, सौ. मधु ललवाणी, सौ. मयुरी संचेती, सौ. कुंदन छाजेड, सौ. सुनिता गादिया, सौ. किर्ती कोटेचा, सौ. खुशबु सिसोदिया, श्रीमती सुनिता कुंभार, सौ. छाया ईंगळे, सौ. राधा शर्मा, सौ. ऊज्वला साखला, सौ. मोना बोरा, सौ. सोनल साखला, आदि असंख्य महिलांनी या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात हिरहिरीने भाग घेवुन धमाल केली.