राज्यस्तरीय केलेली मैत्री मात्र पाचोऱ्यात भोवली, भाजपच्या बॅनरवरुन जिल्हापरिषद सदस्यांचा फोटो वगळला.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०७/२०२३

सद्यस्थितीत केंद्र सरकार व राज्य सरकारमध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. नेमक केव्हा काय होईल याचा काही भरवसा राहिलेला नाही. म्हणून मतदारांच्या भावनांशी खेळ खेळला जात आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. कारण निवडणूक काळात गल्लीबोळात (मी कार्यकर्ता) म्हणून जो, तो आपापल्या पक्षाशी एकनिष्ठ राहुन आपली भुमिका बजावत असतो. परंतु मतदानाच्या जोरावर सत्ता मिळाल्यावर एकही लोकप्रतिनिधींनी आपल्या गल्लीबोळातील कार्यकर्त्यांचा व मतदारांच्या भावनांचा विचार न करता आज या पक्षात तर उद्या दुसऱ्या पक्षात अश्या उड्या मारतांना दिसून येत आहेत असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

कारण मागील काळात मा. श्री. एकनाथराव शिंदे यांनी ४० आमदार सोबत घेत उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना मोठा धक्का देऊन भारतीय जनता पार्टी सोबत घरोबा करुन मुख्यमंत्री पद पदरात पाडून घेतले आहे. यांच्यासोबत पाचोरा भडगाव तालुक्याचे लाडके आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील हेही सामील झाले आहेत. परंतु जेव्हा आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील हे एकनाथराव शिंदे यांच्या सोबत भारतीय जनता पार्टी सोबत गेले तेव्हाच त्यांनी जाहीरपणे सांगितले होते की महाराष्ट्रात जरी भारतीय जनता पार्टी व शिवसेनेची युती झाली असली तरी पाचोरा तालुक्यात मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते मा. श्री. अमोल भाऊ शिंदे व माझी युती कदापीही शक्य नाही व भविष्यातही होणार नाही अशी भूमिका आप्पासाहेब यांनी जाहीर करताच अमोल भाऊ शिंदे यांनीही मी राजकारण सोडून देईल पण किशोर पाटलांंशी कधीच हातमिळवणी करणार नाही असे जाहीरपणे रोखठोकपणे जाहीर केले होते.

परंतु राज्य सरकारमध्ये युती असल्याने भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते तसेच जिल्हापरिषद सदस्य मा. श्री. मधुकर भाऊ काटे यांनी शासकीय योजना जास्तीत, जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सत्ताधारी आमदारांना सोबत घेऊन धडाडीने विकासकामांचा धडाका सुरु केला. ही विकासकामे करत असतांनाच ते सतत आमदारांच्या सोबत राहत असल्याने नेमकी हिच भुमिका मा. श्री. मधुकर भाऊ काटे यांच्यासाठी घातक ठरली अशी जोरदार चर्चा तालुक्यातील राजकीय वर्तुळातून ऐकावयास मिळत आहे.

कारण मा. आमदार किशोर आप्पा पाटील व मा. अमोल भाऊ शिंदे यांच्यातील असलेले टोकाचे मतभिन्नता व वादात मा. मधुकर भाऊ काटे यांचा बळी गेल्याचे स्पष्टपणे बोलले जात असून याचेच जिवंत उदाहरण म्हणजे नव्यानेच नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकार्यांच्या शुभेच्छा बॅनरवरुन जिल्हापरिषद सदस्य मा. मधुकर भाऊ काटे यांचा फोटो गायब झाला असल्याने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. परंतु शेवटी एकच म्हणावे लागेल (हिच भाऊंची इच्छा) असे म्हणत सगळ्यांनी नवीन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी टाळ्या न वाजवता हाताची घडी व तोंडावर बोट ठेवून (जे. जे होईल ते, ते पहा तुका म्हणे उगे रहा.) अशी भूमिका घेतली असल्याचे दिसून येत आहे.

रामकृष्ण हरी.

ब्रेकिंग बातम्या