जागतिक पाणथळ प्रदेश दिनानिमित्त बहुळा धरण परिसरात केली पाणथळ पक्षी गणना.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०२/२०२४
जागतिक पाणथळ प्रदेश दिनाचे महत्त्व लक्षात घेऊन प्रदेश दिनानिमित्त बहुळा धरण परिसरात दिनांक ०२ फेब्रुवारी २०२४ शुक्रवार रोजी पक्षी गणना केली या पक्षी गणनेत ७३ जातींच्या ९४२ पक्ष्यांची नोंद करण्यात आल्याची माहिती पक्षीमित्र शिल्पा ताई व राजेंद्र गाडगीळ यांनी सत्यजित न्यूज कडे दिली आहे.
ही माहिती देतांना पक्षीमित्र शिल्पा ताई व राजेंद्र गाडगीळ यांनी पुढे सांगितले की पक्षी व पर्यावरण यांचा परस्पर संबंध आहे. पाणथळ पक्ष्यांचे अस्तित्व हे पाणथळ प्रदेशाच्या जागेच्या गुणवत्तेवर अवलंबून असते व पाणथळ जागी पक्ष्यांच्या किती जाती किती संख्येने आहेत यावर पाणथळ जागेची गुणवत्ता ठरत असते. त्या दृष्टीकोनातून आम्ही पाणथळ प्रदेशाच्या जागेवर पक्षी गणना केली. पक्षी गणना करतांना आम्हाला प्रामुख्याने विदेशातून आलेले थापट्या, तलवार, बदक, सैबेरीअन, गप्पईदआस, पांढरा धोबी, पिवळा धोबी, ठिपकेवाली व हिरवी तुतारी, रिचर्ड्सची तीर चिमणी यांचे दर्शन झाले. याच बरोबर स्थानिक पक्ष्यांमध्ये वारकरी युरेशियन, चमचा, उघडचोच (करकोचा) स्वरल, रात, बगळा, पाण कावळा, हळदीकुंकू बदक, शेकटे, होला, कंठेरी चिखली, किर पोपट, जांभळी पाणकोंबडी , लाजरी पाणकोंबडी, पाणकोंबडी, रंगीत करकोचा इत्यादी पक्षी आढळून आल्याने याची नोंद करण्यात आली.
*************************************************************
पक्षीमित्र शिल्पा ताई गाडगीळ, राजेंद्र गाडगीळ यांनी व्यक्त केली खंत
*************************************************************
सद्यस्थितीत बदलते वातावरण दिवसेंदिवस निसर्गाचा झपाट्याने होणारा ऱ्हास पाणथळ प्रदेशात मानवाचे वाढते भ्रमण व अतिक्रमण यामुळे दिवसेंदिवस पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. याच बरोबर पक्षी गणनेत अपेक्षित असणारे नयनसरी, शेंबडी बदक, तिरंदाज, पाणलाव, छोटा आर्ली, कऐकर, अटल बदक, युरेशियन, दलदल, कांडेसर हे पक्षी आढळून आले नाहीत अशी खंतही व्यक्त केली. या पक्षी गणनेत बाळासाहेब महांगडे यांचाही सहभाग होता.
1 – Eurasian Spoonbill.चमचा चोच
2-Green-winged Teal. चक्रांग बदक
3 – Northern Pintail तलवार बदक
4 – Northern Shovler. थापट्या
5 – Siberian Stonechat . दगडी गप्पीदास