युक्रेन येथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेला भोकरी येथील सोएब कहाकर मायदेशी परत.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०२/२०२२
पाचोरा तालुक्यातील वरखेड येथून जवळच असलेल्या भोकरी येथील डॉक्टर रशिद कहाकर यांचे सुपुत्र सोएब कहाकर हे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेन येथे गेले होते. परंतु युक्रेन व रशियाचा वाद विकोपाला गेल्यामुळे युद्ध पेटण्याची दाट शक्यता असल्याने भारत सरकारने युक्रेन येथे रहिवासी असलेल्या सर्व भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी धडक मोहीम सुरू केली आहे.
यात जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या भोकरी गावातील डॉ. रशिद कहाकर यांचे सुपुत्र डॉ. सोऐब कहाकर हे आज सकाळी दिल्ली विमानतळावर सुखरूप दाखल झाले असून उद्या सकाळी ते भोकरी येथे पोहचतील डॉ. शोएब हे जळगाव जिल्ह्यातील मायदेशी परतणारे पहिले विद्यार्थी आहेत.
Download WordPress Themes Nulled and plugins.