गरुड महाविद्यालयातील खेळाडूंचे विभागीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/११/२०२२

जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील आप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शेंदुर्णी येथील खेळाडूंनी विविध क्रीडा स्पर्धेत भाग घेऊन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या विभागीय क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदवून घवघवीत यश संपादन केले.

या क्रिडा स्पर्धेत हॉलीबॉल खेळामध्ये कु. गायत्री पाटील कबड्डी खेळामध्ये कु. शितल पाटील व तायकांदो क्रीडा स्पर्धेमध्ये कु. प्रियंका वनारसे व कु. पायल आहीरे तसेच कुस्ती खेळामध्ये कु. प्रियंका वनारसे कु. प्रियंका चौधरी व जितेंद्र धनगर धनंजय देशमुख गोपाल रेकनोड जयेश बडगुजर तसेच ज्युडो स्पर्धेमध्ये कु. प्रियंका चौधरी कु. प्रियंका वनारसे जितेंद्र धनगर व जयेश बडगुजर व मैदानी स्पर्धांमध्ये कु. पायल आहीरे व अक्षय राजपूत यांनी सहभाग नोंदविला या स्पर्धा मध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार येथील जिल्यातील विविध महाविद्यालयातील खेळाडू सहभागी झाले होते.

सदर निवडीबाबत संस्थेचे चेअरमन मा. श्री. दादासाहेब संजय रावजी गरुड संस्थेचे सचिव मा. श्री. सतीश चंद्र काशीद संस्थेचे वरिष्ठ संचालक मा. श्री .सागर काका जैन संस्थेचे सहसचिव मा. श्री. दीपकभाऊ गरुड संस्थेच्या महिला संचालिका सौ. उज्वलाताई काशीद संस्थेचे वस्तीगृह सचिव मा. श्री .कैलासभाऊ देशमुख महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. वासुदेव आर. पाटील व उपप्राचार्य व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी अभिनंदन केले वरील सर्व खेळाडूंना डॉ. महेश आर पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले स्पर्धेत विजयी झालेल्या खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव केला जातो आहे.

ब्रेकिंग बातम्या