जामनेर तालुक्यात ‘होऊ द्या चर्चा’ अभियानाअंतर्गत, शिवसेना जिल्हाप्रमुख दिपकसिंग राजपूत यांनी भाजपा सरकारची काढली खरडपट्टी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/१०/२०२३

शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री लोकप्रिय नेते मा. श्री. उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रभर राबविण्यात येत असलेल्या ‘होऊ द्या चर्चा’ या अभियानाअंतर्गत काल दिनांक ०३ ऑक्टोंबर २०२३ मंगळवार रोजी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मा. श्री. दिपकसिंग राजपूत यांनी जामनेर तालुक्यातील नेरी, पळासखेडा मिराचे सवतखेडा या गावात जाऊन केंद्र व राज्य सरकारच्या खोट्या आश्वासनांचा भांडाफोड केला.

‘या होऊ द्या चर्चा’ अभियानाअंतर्गत बोलतांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मा. श्री. दिपकसिंग राजपूत यांनी सन २०२४ मध्ये निवडणुकीच्या वेळी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी जनतेला जी आश्वासने देत नवनिर्माण भारताची जी स्वप्ने दाखवून सत्ता मिळवून घेतल्यानंतर आजपर्यंतच्या दहा वर्षांच्या काळात एकही आश्वासन पूर्ण न केल्यामुळे जनतेची फसवणूक केल्याने जनतचा भ्रमनिरास झाला असल्याचे पुराव्यानिशी पटवून दिले.

यात मोदी सरकारने सांगितल्याप्रमाणे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही, तसेच सक्तीची कर्जवसुली सुरु केल्यावर कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले. शेती माल उत्पन्नाला सांगितल्याप्रमाणे हमीभाव मिळत नाही. कापूस खरेदी केंद्र बंद ठेवण्यात आली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाची मातीमोल भावाने विक्री करावी लागली. अजुनही तीस टक्के शेतकऱ्यांकडे कापूस घरात पडून आहे. एकाबाजूला दुधाला भाव नाही तर दुसरीकडे पशुखाद्याचे भाव गगनाला भिडले आहेत यामुळे पशुधन पालक हतबल झाले आहेत. सगळीकडे दवाखान्याच्या मोठमोठ्या इमारती उभ्या आहेत परंतु या दवाखान्यात चांगले वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित नाहीत काही ठिकाणी वैद्यकीय अधिकारी आहेत तर औषधे, सर्पदंश, श्वआनदंश लस व इतर सुविधा उपलब्ध नाहीत. यामुळे गोरगरिबांना उपचारासाठी भटकंती करावी लागत आहे. या भटकंतीत वेळेवर उपचार न मिळाल्याने काहींनी आपला जीव गमावला आहे.

“काला धन वापस लायेंगे” याबाबत मोठा गाजावाजा करण्यात आला परंतु आजपर्यंत काला धन तर परत आनलेच नाही. पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या बॅंक खात्यात जमा झालेच नाही. प्रगती ऐवजी
देशातील जनतेला काळोखात ढकलण्याचे काम मोदी सरकार करत आहे आहे. याचेच जीवंत उदाहरण म्हणजे आज नव तरुणांना हाताला काम नाही. उच्चशिक्षित तरुणांना नोकरीसाठी भटकंती करावी लागत आहे. तर दुसरीकडे खाजगीकरण, उदारीकरण करण्याचा सपाटा लावला असल्याने बेरोजगारी वाढली असून तरुणांच्या मनात नैराश्य येत आहे.

महागाई प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला पोहोचले, गरिबांची चूल कशी पेटवावी हा प्रश्न उभा राहिला आहे. नवीन धोरणे नव्या योजना फसव्या असून अंबलबजावणी शून्य आहे. महिला अत्याचार, बलात्कार, विनयभंग प्रमाण वाढले असून गुन्हेगारांवर कठोर कार्यवाही होत नाही हे श्रीरामाचे नाव घेऊन राज्य करण्याचं दुर्दैव आहे. भाजपा सरकारचं महाराष्ट्रात महा आघाडीचे शासन होते मा. श्री शिवसेनाप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते माननीय उद्धवजींनी घेतलेले निर्णय तमाम जनतेच्या हिताचे होते. महाराष्ट्रातील बळीराजाला भक्कम आधार देण्यासाठी कर्जमुक्त करण्यासाठी आत्महत्येचे प्रमाण रोखण्यासाठी विना अटी शर्ती वर सरसकट कर्जमाफी देऊन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहात कापूस व इतर पिकांना हमीभाव दिले.

यातच कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या संकटात असतांना लाखो लोकांचे जीव वाचवण्यासाठी वेळेवर औषधोपचार, ऑक्सिजन व युध्दपातळीवर लसीकरण मोहीम राबवून लॉक डाऊन काळात कुणालाही उपाशीपोटी झोपु न देता यशस्वीपणे लढा दिला. मात्र सत्तेसाठी हपापलेल्या भारतीय जनता पक्षाने कटकारस्थान करुन सत्तांतर घडवून आणले व आज सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडून एकप्रकारे हुकुमशाही व भांडवलशाही आणू पाहात आहे. म्हणून सन २०२४ मध्ये येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे कंबरडे मोडून देशाला वाचवायचे आहे म्हणून आपण आजच भाजप मुक्त देश करण्यासाठी प्रतिज्ञा घेऊया असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मा. श्री. दिपकसिंग राजपूत यांनी केले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख उद्धवभाऊ मराठे, जामनेर शिवसेना तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर भाऊ बोरसे, पाचोरा येथील युवासेना नेते राजेंद्र राणा, शेंदुर्णी शहर प्रमुख भैयाभाऊ गुजर, शिवसेना उपतालुकाप्रमुख अरुण भाऊ पाटील, नेरी येथील ज्येष्ठ शिवसैनिकक शिवाजी पवार, पळासखेडा येथील प्रकाशदादा सूर्यवंशी, नाना हाडप शेंदुर्णी येथील विलास बारी, तुकाराम महाराज, जामनेर येथील संजय पाटील व असंख्य शिवसैनिक, पदाधिकारी, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(यावेळी नेरी येथील संदीपभाऊ खोडपे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.)

ब्रेकिंग बातम्या