दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०१/२०२३

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथून जवळच वाडी व शेवाळे ही दोन गावे आहेत. या गावांची ओळख म्हणजे जोडीने होते ती अशी की वाडी, शेवाळे ही नावे एकत्र घेतली जातात. याच गावापैकी वाडी या गावत मागील बऱ्याच वर्षापासून आजीच्या इस्टेटीवर भुजंग सारखा बाहेरगावाहून रहाण्यासाठी आलेला राजेंद्र भिमराव पाटील (हिवरेकर) आलेला आहे.

याने मागील वर्षी वाडी येथील शेतकऱ्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत शेतकऱ्यांकडून कापूस मोजून घेत कापसाचे पैसे नंतर देतो असे सांगत, चालढकल करत होता ही बाब लक्षात आल्यावर व त्याने केलेला वायदा संपल्यानंतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आमचे पैसे आम्हाला दे असा तगादा लावून धरला परंतु राजेंद्र पाटील यांच्या मनात शेतकऱ्यांचा पैसा हडप करण्याचा कुटील डाव मनात असल्याने
राजेंद्र पाटील याने सगळ्यांच्या नजरा चुकवत पत्नी व दोन मुलांना घेऊन वाडी येथून पोबारा होता.

राजेंद्र गाव सोडून गेल्यानंतर शेतकऱ्यांनी राजेंद्रचा भाऊ रवींद्र (शंकर) याच्या मागे तगादा लावला म्हणून रवींद्रने पैसे आज देतो उद्या देतो अशी आश्वासने देऊन एक एक दिवस शेतकऱ्यांना भूलथापांना मारत होता. तसेच राजेंद्र कुठे आहे याबद्दल माहिती देत नसल्याने कापूस विक्रेत्यांनी राजेंद्र, रवींद्र, भिमराव यांच्या विरोधात दिनांक २४ फेब्रुवारी २०२२ रोजी तक्रार दाखल करत राजेंद्र व रवींद्र यांना शोधून त्यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल करुन आम्हाला आमच्या कापसाचे पैसे मिळवून द्यावेत अशी मागणी केली होती.

तक्रार दाखल झाल्यानंतर पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी सत्य परिस्थिती जाणून घेत कापूस व्यापारी राजेंद्र व रवींद्रचा शोध सुरु करुन लवकरात लवकर पकडण्यासाठी पिंपळगाव हरेश्वर पोलीस प्रयत्नशील होते. शोध मोहीम सुरु असतांनाच मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन रविंद्र पाटील याला नवसारी येथुन अटक करण्यात आली असून आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

रविंद्र याला अटक झाल्याची माहिती मिळताच फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशनला जाऊन पोलिसांचे आभार मानले व रविंद्र यांच्याकडून आमचे पैसे कसे मिळतील यासाठी आपण कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

(सविस्तर बातमी उद्या)

वाडी येथील कापूस व्यापारी शेतकऱ्यांचा एक कोटी रुपयांचा कापूस घेऊन फरार.

गुन्हा दाखल करण्यात आला त्यावेळेची बातमी.