पाचोरा शहरातील मुस्लीम समाज बांधवांचा पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे व वैशाली पाटील यांच्यावर विश्वास दाखवत शिवसेनेत प्रवेश.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०९/२०२२
पाचोरा शहरातील मुस्लिम समाजबांधवांनी माजी मुख्यमंत्री मा. श्री. उध्दव ठाकरे साहेब व सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्यावर विश्वास दाखवत दिनांक ०४ सप्टेंबर २०२२ रविवार रोजी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.
यावेळी शोएब असलम खान, फेजल मेहबूब खान, सद्दाम खाटीक मुजाहिद, निसार खान, सलीम खान, आदिल खाटीक, सोहिल असलम खान, रिहान सय्यद मुस्लिम, वाहब बागवान, परवेज खान, सलमान शेख, नजीर रेहान, रशीद मिर्झा, अरबाज शरीफ खान, शौए फकिराशे, जमीदिन बागवान, यांनी शिवसेनेत प्रवेश केला म्हणून सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी या मुस्लिम बांधवांच्या गळ्यात शिवसेनेचा भगवा रुमाल टाकून सत्कार केला.
यावेळी एडवोकेट अभय पाटील रमेशचंद्र जी बाफना जळगाव जिल्हा शिवसेना प्रमुख दीपकसिंग राजपूत माझी पंचायत समिती सदस्य उद्धवजी मराठे नरेंद्रसिंह सूर्यवंशी पप्पू राजपूत संदीप जैन नंदू शेलार अभिषेक खंडेलवाल नानाभाऊ वाघ पप्पू जाधव तसेच सर्व शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी हजर होते
(तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही ~ सौ. वैशालीताई सुर्यवंशी)
तुम्ही माजी मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवजी ठाकरे व माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही असे मत
मुस्लिम बांधवांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर वैशालीताई सुर्यवंशी यांनी व्यक्त केले.