सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जामनेर, पाचोरा रस्ते व रेल्वे प्रकल्पांना वेग; मात्र गावठाण, गायरान जमिनीवरील मुरुम उत्खननाची भीती वाढली

  • दुसऱ्यासाठी खड्डा खणला… आणि स्वत:च त्यात पडल्या! कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या जाकिराबी कहाकर अपात्र.

  • तपोवनातील हजारो वृक्षतोडीच्या प्रस्तावावर जिल्हाभरातून संताप, पाचोरा पत्रकार संघाचा प्रशासनाला ठणकावलेला इशारा.

  • अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • “शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला! पाचोर्‍यात अनुदान घोटाळा उघड, नाव तुमचं, आधार-खाते दुसऱ्याचं!”

राजकीय
Home›राजकीय›कोविड काळात पाचोऱ्याची जनता घरांत,मात्र नगरपरिषदेने काढली भूखंड घोटाळ्याची २०० कोटींची वरात.

कोविड काळात पाचोऱ्याची जनता घरांत,मात्र नगरपरिषदेने काढली भूखंड घोटाळ्याची २०० कोटींची वरात.

By Satyajeet News
August 24, 2022
168
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०८/२०२२

भुखंडाच श्रीखंड खाणाऱ्या नगरपरिषद प्रशासन व तत्कालीन सत्ताधारी आणि यातील मुख्य सुत्रधारांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी भाजपचे जेष्ठ नेते अमोल भाऊ शिंदे यांनी केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की कोविड काळात पाचोरेकर जनता जिवाच्या भीतीने घरात सुरक्षित असताना येथील नगरपालिका प्रशासनाने तमाम नागरिकांना अंधारात ठेवून जनतेचा खूप मोठा विश्वास घात केला आहे. थोडीथोडकी नव्हे तर सुमारे २०० कोटी रुपयांची ही फसवणूक असल्याचा अंदाज असून यामध्ये प्रशासन व सत्ताधारी यांनी एकत्रितपणे षडयंत्र करून समाजव्यवस्थेची फसवणूक केली आहे.भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये नगर परिषद प्रशासनाच्या कोट्यवधी रुपयांचा भूखंड घोटाळा संदर्भात माहिती दिली आहे.

नगरपालिका प्रशासन व नगर रचना विभाग यांच्यामार्फत प्रत्येक २० वर्षानंतर शहराच्या गरजा व शहर विकासाच्या अनुषंगिक बाबींचा सविस्तरपणे विचार करून नागरिकांच्या सोयीसुविधा व महत्त्वपूर्ण गरजांसाठी विकास आराखडा तयार करण्यात येतो. त्या अनुषंगाने पाचोरा नगरपरिषद हद्दीतील शहर विकास आराखड्यास दि.२०/०२/२०१५ च्या शासन निर्णय नुसार मंजुरी देऊन सदर आराखडा पाचोरा शहरासाठी प्रसिद्ध झाल्यानंतर पाचोरा नगर परिषद हद्दीत अमलात आलेला आहे.त्यानुसार नगर विकास विभागामार्फत शहरांसाठी आवश्यक असणारी भूखंडावरील आरक्षणे महाराष्ट्र नगररचना अधिनियम १९६६ नुसार सर्व प्रक्रिया होऊन अंतिम विकास आराखडा व त्यात आरक्षित केलेल्या जमिनीवर पुढील २० वर्षांच्या काळासाठी शहर विकासाचे साचेबद्ध नियोजन करूनच सदरचा आराखडा अंतिमतः मंजुर करण्यात आला आहे.

परंतु पाचोरा नगरपरिषदेने याबाबतीत मागील न्यायालयांचे निकाल व कायद्याच्या तरतुदींच्या विरोधात जात कोरोना महामारीच्या संकटकाळात संधी साधत शासकीय कार्यालयात फक्त अत्यावश्यक सुविधांवर कामकाज सुरू असताना ऑनलाइन सभांच्या नावाखाली ऑनलाईन मिटिंग घेऊन विरोधी नगरसेवकांना नकळत व अंधारांत ठेऊन चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीर ठराव करून घेतले.व पाचोरा शहरातील जवळपास ८ भूखंडावरील आरक्षण रद्द करण्याकरिता पाचोरा नगरपरिषदेचे प्रशासन व तत्कालीन लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि सत्ताधाऱ्यांनी सदर बेकायदेशीर कृत्य केले आहे.

या संपूर्ण विषयाची माहिती घेतली असता व सखोल चौकशी केली असता एकदा विकास आराखडा मंजूर केल्यावर त्यात बदल करण्यासाठी व रद्द करण्यासाठी नियोजन प्राधिकरणाच्या माध्यमातून लोकांचे आक्षेप मागवले जातात व त्यासाठी व्यापक प्रमाणात मोठ्या खपाच्या वर्तमानपत्रात किंवा इतर प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून हरकती मागविल्या जातात.परंतु हरकती या कमी खपाच्या वर्तमानपत्रात देण्यात आल्या व तसेच कोविड काळात नागरिक वर्तमानपत्र ही घेत नव्हते त्यामुळे इतरत्र कुठेही माहिती मिळाली नाही.कोणास हरकती घेण्यासाठी कोविड निर्बंधांमुळे कदाचित घराबाहेर पडुन हरकत नोंदविता आली नसावी.असे नियोजन बद्ध बेकायदेशीररित्या हे गैरकृत्य घडवून आणले आहे.असे अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले

तसेच सदर भूखंडावरील आरक्षणे रद्द करण्यासाठी प्रस्तावित केलेले आहे.तेच आरक्षण अन्य दुसऱ्या भूखंडावर टाकणे गरजेचे असते मात्र ते अन्यत्र कुठेही दर्शविले नाही.तसेच सदर आरक्षण रद्द करण्याबाबत च्या भूखंडांचा प्रस्ताव हा सद्यस्थितीत मा.संचालक सो,नगर रचना पुणे यांच्या अंतिम मंजुरीसाठी प्रस्तावित असून सदर बेकायदेशीर व चुकीच्या पद्धतीने ठराव करुन तयार करण्यात आलेले प्रस्तावास अंतिम मान्यता देण्यात येऊ नये.अशी शासनदरबारी मागणी केली आहे. असे देखील अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले.

भूखंडांचे तत्कालीन नगरपालिका सत्ताधाऱ्यांकडून सदर जागेवर आरक्षण कायम असतानाच मुळ मालकासोबत अत्यंत अत्यल्प भावात अनोंदणीकृत सौदापावत्या देखील झाल्या असल्याचे कळते. या भूखंडांचे मुल्यांकन बाजारभावाप्रमाणे काढल्यास अंदाजे २०० कोटी रुपये दिसून येते.तसेच प्रचंड वेगाने वाढत चाललेल्या पाचोरा शहराच्या विकासासाठी भविष्यात गार्डन,प्लेग्राउंड,शॉपिंग सेंटर्स,प्राथमिक व माध्यमिक शाळा,भाजीपाला मार्केट यासारख्या असंख्य सोयीसुविधा साठी भविष्यात जागाच शिल्लक राहणार नाही.या दूरदृष्टीने विचार नकरता उलट पाचोरा नगर परिषदेने शाळा कॉलेज,ग्राउंड व मार्केट हे अगोदरपासूनच उपलब्ध असल्याचे दाखले देत सदरचे आरक्षण गरजेचे नाही.असे दर्शवून आरक्षण रद्द करण्यासाठी शासनाकडे अति घाईने शिफारस केली आहे. अश्या पद्धतीने नगरपालिका प्रशासन व तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या आर्थिक लाभाकरिता शहरातील नागरिकांसह शासनाची देखील दिशाभूल करून फसवणूक केली आहे. असे यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी बोलतांना सांगितले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 60
Previous Article

मोसंबी पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी ...

Next Article

अजानच्या भोंग्यांबाबत उच्च न्यायालयाने दिला हा महत्वपूर्ण ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • राजकीय

    माजी आमदार श्री. दिलीप भाऊ वाघ. कोरोनावर मात करून स्वगृही परतले.

    March 1, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    चिंचपूरे येथील राष्ट्रवादी काँग्रेस व शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपात दाखल.

    April 1, 2024
    By Satyajeet News
  • राजकीय

    *शेदुर्णी येथील अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

    November 14, 2020
    By Satyajeet News
  • राजकीय

    गॅस, पेट्रोल, डिझेलचे दरवाढ व बारा आमदारांच्या गैरवर्तणूकीचा निषेध करीत चाळीसगाव शिवसेनेचे तिव्र आंदोलन.

    July 7, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    अधिकारी सत्तेतल्या पदाधिकाऱ्यांचे ऐकत नसतील,तर सर्वसामान्य जनतेची काय कथा ? संतोष पाटील अंबे वडगाव.

    August 21, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ यांची भुमिका तळ्यात, मळ्यात, भावी आमदाराची माळ टाकवी कुणाच्या गळ्यात. जनतेच्या मनातील प्रश्न ...

    July 10, 2023
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    श्री. सु. भा. पाटील प्राथमिक विद्यामंदिरात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी.

  • क्राईम जगत

    आईच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पित्याचा रागाच्या भरात मुलांनीच केला खून.

  • Uncategorized

    जळगाव जिल्हयात आज ९७१ कोरोना बाधित रुग्ण आढळले तर ८ रुग्णांचा मृत्यू.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज