पाचोरा पुरवठा विभागात सावळा गोंधळ, सामाजिक कार्यकर्त्याने घेतला खरपूस समाचार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०१/२०२३
पाचोरा तालुक्यात रेशनकार्ड बनवण्यापासून तर रेशनिंग धान्य वाटपात मोठा घोळ होत असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढतच असून पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक येवले नावाचा डंका संपूर्ण तालुक्यात वाजत असून या पुरवठा विभागात भ्रष्ठाचाराची जोरदार हवा असल्याने महत्वाची कागदपत्रे उडून जाऊ नयेत म्हणून दरवाजे, खिडक्या लावून काही मदतगारांना हातचे धरुन ज्या, ज्या कागदपत्रांवर वजन ठेवण्यात आले आहे अश्या कागदपत्रांची त्वरित दखल घेऊन कागद हातात घेण्या अगोदर कागदावर ठेवलेली वजनदार वस्तू उचलून खिशात ठेवून झाल्यावर ती कागदपत्रे कायद्याच्या चौकटीत बसोत वा ना बसोत तरीही त्यांना अग्रक्रम देऊन लगेचच संबंधित रेशनकार्ड बनवणे, रेशनकार्ड विभक्त करणे, रेशनकार्ड मध्ये असलेली नावे कमी करणे, नाव वाढवणे, बारा अंकी कोड देणे, सधन कुटुंबातील लोकांना जास्तीत, जास्त मोफतचे धान्य कसे मिळेल अश्या सवलतींचे रेशनकार्ड बनवण्यापासून तर अंत्योदय राशन कार्ड (AAY), बीपीएल राशन कार्ड (BPL) एपीएल राशन कार्ड (APL), अन्नपूर्णा राशन कार्ड (AY), प्राथमिकता राशन कार्ड (PHH) अशी रेशनकार्ड बनवतांन सर्व नियम व अटी धाब्यावर ठेवून कागदावर जसे वजन असेल त्याप्रमाणे कार्ड बनवून देणे हा प्रकार राजरोसपणे सुरु असल्याकारणाने पाचोरा पुरवठा विभाग एक चर्चेचा विषय ठरला असून या गैरकारभाराकडे मा. तहसीलदार साहेब व मा. प्रांताधिकारी यांनी लक्ष देऊन पुरवठा विभागात सुरु असलेला सावळागोंधळ त्वरित थांबवावा अशी मागणी केली जात आहे.
विशेष म्हणजे आज दिनांक १६ जानेवारी २०२३ सोमवार रोजी एका समाज संघटनेचे जिल्हास्तरीय कार्यकर्ते हे काही कामानिमित्ताने पाचोरा पुरवठा विभागात शंका विचारण्यासाठी गेले होते. त्यांनी पुरवठा निरीक्षक येवले यांच्याशी चर्चा सुरु करुन समस्या सोडविण्यासाठी सांगत असतांनाच येवले यांनी संबंधित समाज संघटनेच्या जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांसोबत अरेरावीची भाषा करत हमरीतुमरीवर उतरल्याचे खात्रीलायक वृत्त असून त्या घटनेचे काही क्षणचित्रे व चित्रफिती सत्यजित न्यूजच्या हाती लागली आहेत. ही घटना घडल्यानंतर संबंधित एका समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा मा. तहसीलदार साहेब यांच्याकडे वळवला परंतु मा. तहसीलदार साहेब काही कामानिमित्ताने बाहेर गेले असल्याने व मा. तहसीलदार साहेब हे कर्तव्यदक्ष व सर्वसामान्य जनतेच्या समस्या त्वरित निवारण करणारे अधिकारी असल्यामुळे संबंधित सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी मा. तहसीलदार साहेबांना भेटून पुरवठा निरीक्षक येवले यांच्या गैरवर्तणूकी बाबत तक्रार दाखल करणार असल्याचे बोलले जात आहे.