पोळा फुटला सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरण सरपंच व सदस्यांना केले अपात्र (अतिक्रमण धारक सरपंच सदस्यांमध्ये घबराट.)
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०२/२०२१
सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी जिल्हा अधिकारी अभिजित राऊत यांनी सरपंच व सदस्यांना केले अपात्र अतिक्रमण धारक सरपंच सदस्यांमध्ये घबराटीचे वातावरण.
लोण प्र.ऊ. तालुका भडगाव येथील सरपंच सौ संगीता बापू पाटील व ग्रामपंचायत सदस्य बापू नागो पाटील यांनी ग्रामपंचायत मालकीच्या सरकारी जागेवर बांधकाम केल्याचे सिद्ध झाल्यामुळे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी ग्रामपंचायत सरपंच व सदस्य पदावर पती व पत्नी यांना अपात्र केले आहे. या प्रकारामुळे मात्र जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली असून अतिक्रमणधारक सरपंच व सदस्य यांच्यामध्ये घबराट निर्माण झाली
याबाबत सविस्तर वृत्त असे की लोण प्र.ऊ.तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत सरपंच सौ संगीता बापू पाटील व सदस्य बापू नागो पाटील यांनी ग्रामपंचायत मालकीच्या सरकारी जागेवर क्षेत्रफळ ५४० चौरस फूट जागेवर राहते घराचे बांधकाम करून बेकायदेशीरपणे अतिक्रमण केल्यामुळे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४(१)(ज-३) चा तरतुदीचा भंग केल्यामुळे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी त्यांना सरपंच व सदस्य पदावरून अपात्र घोषित केले आहे.
या निकालामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले आहे तक्रारदार सौ गीता भाऊसाहेब पाटील यांच्या वतीने अँड.विश्वासराव भोसले (पिंपरखेड) यांनी काम पाहिले या निकालामुळे जिल्ह्यातील अतिक्रमणधारक सरपंच व सदस्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.