केंद्र सरकारकडून जैन समाजाबाबत चुकीचा अहवाल दिल्याबद्दल कुसुंम्बा जैन समाजातर्फे जाहीर निषेध.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/०५/२०२२
केंद्र सरकारने राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा पाचवा सर्वे केल्याचे नुकतेच जाहीर करत या अहवालानुसार जैन धर्मीयांत १४.०९ टक्के पुरुष व ०४.०३ टक्के महिला मांसाहारी असल्याचे या सर्वेक्षणात दर्शवण्यात आले आहे. मात्र हे सर्वेक्षण करतांना संबंधितांनी उंटावरून शेळ्या चारत कोणतीही शहानिशा न करता हा चुकीचा अहवाल तयार केला असल्याचा आरोप भारतातील नव्हे तर जगभरातील सकल जैन समाजाकडून केला जात असून केंद्र सरकारच्या या अहवालाचा व केंद्र सरकारचा कुसुंबा येथील जैन समाज बांधवांनी एक निषेध सभा घेऊन जाहीर निषेध केला आहे.
या सभेत जैन समाज हा अहिंसा परमो धर्म, जीओ और जीने दोन या दोन मुलभूत तत्वावर चालणारा तसेच अहिंसावादी व शाकाहाराचा पुरस्कर्ता आहे. जैन समाज हा मुंगीला सुध्दा मारत नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. परंतु केंद्र सरकारने राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण करतांना कोणत्या पध्दतीने सर्वेक्षण केले हेच आम्हाला कळत नसून केंद्र सरकारने केलेले हे सर्वेक्षण चुकीच्या माहितीच्या आधारे केले असल्याचे आमचे ठाम मत असून या सर्वेक्षणावर सकल जैन समाजाचा अजिबात विश्वास नाही असे स्पष्ट करत जैन समाज हा अल्पसंख्याक, अहिंसावादी, शाकाहाराचा पुरस्कर्ता आहे. तसेच याबाबत आजपर्यंत कुठेही व कुणीही अशी माहिती विचारलेली नसतांना केंद्र सरकारने असा चुकीचा सर्वे करुन तो जाहीर केला असल्याने जैन समाजाला बदनाम करण्यासाठी ही नवीन राजकीय खेळी तर खेळली जात नाही ना ? असा सवाल उपस्थित करत जैन समाजबांधवांनी केंद्र सरकारचा अत्यंत तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
विशेष म्हणजे ‘अहिंसा परमो धर्म, जिओ और जिने दो या मूलभूत तत्वावर चालणाऱ्या जैन समाजावर चुकीचे सर्वेक्षण करून असा आक्षेप करणे म्हणजेच अहिंसक समाजाच्या शुध्द प्रतिमेचे हनन असून हा सर्वेक्षण अहवाल त्वरित रद्द करण्यात यावा अन्यथा केंद्र सरकारच्या विरोधात सकल जैन समाज देशभरातून तिव्र आंदोलन छेडल्या वाचून राहणार नाही व पुढे होणाऱ्या परिणामांची सर्व जबाबदारी केंद्र सरकारची राहील असे जैन समाज बांधवांनी जाहीर केले आहे.
या जैन समाजातर्फे घेण्यात आलेल्या जाहीर निषेध सभेत कुसुंबा क्षेत्राचे विश्वस्त तसेच खान्देश जैन समाजाचे प्रसिद्धी प्रमुख सतीश वसंतलाल जैन (कुसुम्बा), महेंद्र हिरालाल जैन. (विश्वस्त), पारस नवनीतलाल जैन, मयुर रिखब जैन, पंकज नगीनदास जैन, स्वप्निल महेंद्र जैन, राहुल सुंदरलाल जैन, चंद्रकांत शांतीलाल जैन, महावीर सुभाष जैन, विपुल अशोक जैन, प्रमोद पानाचंद जैन, मोहीत राजेंद्र जैन, राजू नवनीतलाल जैन, संदीप अशोक जैन, गौरव जैन हे उपस्थित होते.
तसेच कापडणा, सोनगीर, नरडाणा, मांडळ, वरखेडी, पारोळा, अमळनेर, चोपडा, दहिगाव, शेंदुर्णी, पिंपळगाव हरेश्र्वर, आनंदखेडा देवूर, म्हसदी आदी गावागावांतील व जगभरातील जैन समाज या चुकीच्या अहवालामुळे दुखावला गेला आहे. यामुळे फक्त जैन समाजच नव्हे तर जगभरातील अहिंसा प्रेमी अजैन सुद्धा या अहवालाचा निषेध करत आहेत असल्याकारणाने केंद्र सरकारने जैन समाजाबद्दल चुकीचा सर्व करुन जैन समाजाला दुखावलं आहे अशी माहिती खान्देश जैन समाजाचे प्रसिद्धी प्रमुख व कुसुंम्बा अतिशय क्षेत्राचे विश्वस्त सतिश वसंतातलाल जैन यांनी दिली असून केंद्र सरकारने हा अहवाल त्वरित मागे घ्यावा व सकल जैन समाजाची जाहीर माफी मागावी अन्यथा जैन समाजाकडून संपूर्ण भारतभर जन आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामांची जबाबदारी केंद्र सरकारची असेल असे जाहीर केले आहे.