जळगाव ग्रामीण चे आमदार मा. श्री. गुलाबराव पाटील यांना मंत्रीपदाची शपथ देऊ नये. महाराष्ट्र जागृत जनमंचे शिवराम पाटील यांची मागणी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०८/२०२२
जळगाव ग्रामीण चे आमदार श्री गुलाबराव पाटील यांना मंत्रीपदाची शपथ देऊ नये. अशी मागणी महाराष्ट्र जागृत जनमंचे शिवराम पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मा. राज्यपाल महामहीम भगतसिंग कोशीयारी व मा. मुख्यमंत्री यांच्याकडे ईमेल व्दारे केली आहे. ती पुढीलप्रमाणे आहे.
जळगाव
दिनांक..७-८-२०२२
प्रति.. महामहिम भगतसिंग कोशीयारी
मा.राज्यपाल, महाराष्ट्र राज्य.
विषय.. जळगाव चे माजी पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील यांनी नियोजनबद्ध अपहाराची दखल घेणेबाबत.
महोदय,
कोरोना रोगराई काळात जनतेचे प्राण वाचवण्यासाठी जिल्हा नियोजन समीतीने आमदार व खासदार निधीतून ४००कोटी रूपये खर्च करण्याची तरतूद केली आहे.ग्रामीण रूग्णालयाकरीता औषधे,साधनसामग्री व यंत्रसामुग्री खरेदी साठी पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील यांची जबाबदारी होती.परंतु गुलाबराव पाटील यांनी स्वताचे हित साधण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील २५९१ लोकांचे प्राण गमावले.
अ)व्हेंटिलेटर खरेदी घोटाळा…..
पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील यांच्या आदेशानुसार डॉ नागोजीराव चव्हाण यांनी
१) ३० मैक्स प्रोटान प्लस व्हेंटिलेटरचा कॉन्ट्रॅक्ट “लक्ष्मी सर्जिकल्स अँँड फार्मा ” या पुरवठा कंपनीशी केला.
२) मैक्स प्रोटान प्लस ची ऑनलाइन किंमत प्रत्येकी ५,५५,००० रूपये आहे.कोटेशन उपलब्ध आहे.
असे असतांना कॉन्ट्रॅक्ट मधे मैक्स प्रोटान प्लस व्हेंटिलेटरची प्रत्येकी किंमत १२,३८,४७१ रूपये मंजुर केली आहे.
एका व्हेंटिलेटर मागे ६,६०,९७१रूपये जास्त दिले.
असे एकूण ३० व्हेंटिलेटरची किंमत ३,७१,५४,१३० रूपये पुरवठादारास अदा केली आहे.
एकूण १,९८,२९,१३० रूपये जास्त दिले.हा आर्थिक अपहार केला आहे.(६,६०,९७१×३०=१,९८,५४,१३०रुपये जास्त).
३) २९-६-२०२१ ला १५ व्हेंटिलेटर चा पुरवठा कंपनीने केला.त्यात मैक्स प्रोटान प्लस ऐवजी श्रेयस ९०० ब्रैंड चे असेम्बल्ड व्हेंटिलेटर चा पुरवठा केला.मोहाडी येथील डिस्ट्रिक्ट वुमन हॉस्पिटलमधे पाठवले. सिव्हिल सर्जन डॉ चव्हाण यांनी स्विकारले.
४) १९-७-२०२१ रोजी आणखी १५ व्हेंटिलेटरचा पुरवठा कंपनीने केला. त्यातही सॅक्सन ऑर्डर मैक्स प्रोटान प्लस ऐवजी श्रेयस ९०० ब्रैंड चे असेम्बल्ड व्हेंटिलेटर घेतले.आदेश वेगळा आणि पुरवठा वेगळा.
ब्रैन्डेड व्हेंटिलेटर ऐवजी असेम्बल्ड व्हेंटिलेटर घेतले.कोटेशन मधील किंमत पेक्षा जास्त किंमत देऊन डुप्लीकेट ,कन्डेम्न व्हेंटिलेटर घेतले.
५)याबाबत कलेक्टर कडे तक्रार केल्यानंतर जळगाव मोहाडी येथील गोडाऊन मधे दिनांक २-८-२०२१रोजी तपासणी केली.त्यात व्हेंटिलेटर च्या मॉडेल व ब्रेंड मधे तफावत झाल्याचे सिव्हिल हॉस्पिटलचे (१) भांडारपाल मिलींद काळे,(२)कारकून जितेंद्र परदेशी आणि (३)विक्री प्रतिनिधी घनश्याम पाटील यांनी यांनी सिव्हील सर्जन डॉ चव्हाण यांना लेखी कळवले.
६) जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमधील (१)वैद्यकीय आधिकारी डॉ उल्हास बी तासखेडकर ,(२) बालरोगतज्ज्ञ डॉ वृषाली सरोदे ,(३)सर्व्हिस इंजिनिअर श्री एकनाथ काकडे यांनी दिनांक २३-८-२०२१ ला व्हेंटिलेटर चे मॉडेल व ब्रँड मधे तफावत असल्याचा आक्षेपार्ह अहवाल कलेक्टर कडे दिला.
७) कलेक्टर श्री अभिजित राऊत यांनी किंमतीत हेराफेरी व कन्डेम्न व्हेंटिलेटर ची दखल घेऊन दिनांक २३-८-२०२१ रोजी उपरोक्त व्हेंटिलेटरची प्रशासकीय मान्यता रद्द केली केली.
८) व्हेंटिलेटरची किंमत जाणीवपूर्वक जास्त लावणे ,तसेच मॉडेल व ब्रैंड बदल करणे उघडकीस आले आहे. म्हणून सिव्हिल सर्जन डॉ. चव्हाण यांनी दिनांक २६-८-२०२१ रोजी ३०व्हेंटिलेटर परस्पर गायब केलेत.अपहाराचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
९) आमदार मा.चिमणराव पाटील यांनीसुद्धा व्हेंटिलेटरची खरेदीबाबत जिल्हा विकास नियोजन समीतीच्या २१-१२-२०२१च्या बैठकीत लेखी आक्षेप घेतला आहे.
१०) आमदार मा.विलास पोतनीस यांनी विधानसभा अधिवेशनात व्हेंटिलेटर खरेदीबाबत मा.आरोग्य मंत्र्यांना एलएक्यू प्रश्न विचारला आहे.
११) आरोग्य मंत्री मा.राजेश टोपे यांनी सुद्धा व्हेंटिलेटर खरेदीत घोटाळा झाल्याचे मान्य केले.चौकशी करू.असे सभागृहात उत्तर दिले.
१२) तक्रारदार श्री दिनेश भोळे यांनी दिनांक २१-१२-२०२१ जळगाव जिल्हा पेठ पोलिसात ऑनलाइन तक्रार दिली आहे.
१३)तक्रारदार दिनेश भोळे यांनी जळगाव जिल्हा पेठ पो. पोलीसात दिनांक २९-१२-२०२१लेखी तक्रार दिली आहे.
१४) पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील यांनी पदाचा गैरवापर करून तपास थांबवला .
ब)ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी घोटाळा….
१५) जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून १२०नग ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर खरेदीस डीपीडीसी अध्यक्ष्यांनी मंजुरी दिली.
१६) पुरवठादाराने दिलेल्या कोटेशन नुसार प्रत्येकी नगाचे बाजार मुल्य फक्त ३० हजार असतांना १,२५००० ची मंजुरी दिली. एका नगाच्या खरेदीतून ९५,०००चा नियोजित अपहार केला आहे.एकूण १,५०,००,०००एक कोटी पन्नास लाखाच्या खरेदीत १,१४,००,०००रुपयाचा अपहार केलेला आहे.(९५,००० जास्त ×१२० नग १,१४,००,०००)एक कोटी चौदा लाखाचा अपहार केलेला आहे.
क)डिजिटल थर्मामीटर खरेदी घोटाळा..
१७) जळगाव जिल्ह्यातील आयसोलेशन वार्ड साठी २४-३-२०२१ ला ३० डिजीटल थर्मामीटर प्रत्येकी १५०० रूपये प्रमाणे खरेदी करण्यात आले.३०×१५००़४५,०००फक्त ४५हजार मुल्य होत असतांना त्यावर भास्कर वाघ चे श्यून्य वाढवून ४,५०,००० रूपये (चार लाख पन्नास हजार रुपये अशी हेराफेरी केली आहे.श्यून्य वाढवून चक्क ४लाख ५हजाराचा अपहार केलेला आहे.
१८) ही खरेदी पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील यांच्या सुचनेनुसार केलेली आहे,असे लिखीत , अधिकृत पत्र देऊन अपहाराची, घोटाळा ची संपूर्ण जबाबदारी पालकांची श्री गुलाबराव पाटील यांची असल्याचे स्पष्ट उत्तर दिलेले आहे.
पालकमंत्री श्री. गुलाबराव पाटील यांनी मंत्रीपदाचा गैरफायदा घेऊन अपहार तर केलाच. शिवाय पुरावा सुद्धा नष्ट केला आहे.आर्थिक फायद्यासाठी जनतेच्या जिवीताशी प्रतारणा केली आहे.
१९) या अपहाराची तक्रार श्री दिनेश कडू भोळे व श्रीमती माधुरी चंद्रशेखर अत्तरदे यांनी जळगाव जिल्हा पेठ पोलिस स्टेशनमध्ये केली आहे.पोलिसांनी पालकमंत्री च्या दबावाखाली एफआयआर नोंदणेस टाळाटाळ केली आहे.
२०) श्री. दिनेश भोळे व श्रीमती माधुरी अत्तरदे यांनी जळगाव प्रथम वर्ग न्यायालयात खटला दाखल केला आहे.मा.न्यायालयाने सीआरपीसी १५६-३नुसार चौकशी चे आदेश पोलिसांना दिले आहेत.तरीही पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील यांच्या दबावाखाली पोलिसांनी तपास थांबवला आहे.
जर जिल्हा नियोजन समीतीचा निधीचा योग्य वापर करून वापरायोग्य व्हेंटिलेटर व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी केले असते तर किमान २५९१ रूग्णांचे प्राण वाचवता आले असते.
यास्तव गुलाबराव पाटील यांना पुन्हा मंत्रीपद देण्यात येऊ नये,असे पत्र मा.मुख्यमंत्र्यांना समक्ष भेटून दिले आहे.
महोदय,२०१९विधानसभा निवडणूकीत उमेदवारी करतांना गुलाबराव पाटील यांनी जी संपत्ती जाहीर केली त्यापेक्षा अनेक पटीने त्यांची अनधिकृत संपत्ती वाढलेली आहे.इडी पासून वाचण्यासाठी त्यांनी नातेवाइक व मित्रांच्या नावे संपत्ती खरेदी केलेली आहे.याची माहिती मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांना समक्ष भेटून दिली.तसेच गुलाबराव पाटील दोषमुक्त होईपर्यंत मंत्रीपद देऊ नये,अशी विनंती केली आहे.तरीही मुख्यमंत्री महोदय गुलाबराव पाटील यांना मंत्रीची जबाबदारी सोपवत असतील तर मंत्री पुन्हा जास्त जोमाने भ्रष्टाचार करतील.भ्रष्टाचाराला लगाम घालणे कठिण होईल.
महामहिम राज्यपाल महोदय, आपल्या स्तरावर दखल घेऊन श्री गुलाबराव पाटील यांचेवर इडी मार्फत चौकशी करण्यात यावी.दोषमुक्त झाल्यानंतरच त्यांना मंत्रीपद द्यावे.अन्यथा २५९१मृत आत्म्यांचे पाप डोक्यावर बोझ म्हणून राहिलच.आम्ही मुख्यमंत्री आहोत.आम्हाला कोणी शहाणपण शिकवू नये.कोण चोर ,कोण साव सांगू नये.या आविर्भावात शिंदे साहेब आहेत.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत राज्यपाल नियुक्त आमदार साठी १२ लोकांच्या यादीत अपात्र व भ्रष्टाचारी लोकांची नावे दिली होती.मा.राज्यपाल महोदयांनी सद्सदविवेक बुद्धीने ती नाकारलीत.अशीच सद्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून गुलाबराव पाटील यांना मंत्री पदांची शपथ नाकारावी.मुख्यमंत्री चुकले तरी राज्यपाल महोदयांनी ती चूक दुरुस्त करावी.असा संविधानाचा संकेत आहे.महामहिम भगतसिंग कोशीयारी आपल्या पदाचा जबाबदारीने वापर करून भ्रष्टाचारी आमदाराला मंत्रीपदाची शपथ देणे नाकारतील.अशी विनंती करीत आहोत.
मुख्यमंत्री सुद्धा स्वताच्या आर्थिक हितासाठी किंवा पक्षाच्या वाढीसाठी भ्रष्टाचारी आमदाराला मंत्रीपद देतात.हे चुकीचे आहे.आम्ही नागरिक फक्त न्यायालयाच्या माध्यमातून विरोध करू शकतो.पण राज्यपाल महोदयांनी आपले घटनात्मक अधिकार वापरले तर सहजपणे भ्रष्टाचारीला मंत्रीपदासाठी विरोध होऊ शकतो.महामहिम भगतसिंग कोशीयारी यांनी ही जबाबदारी मागील तीन वर्षात चोख बजावली आहे.आता ही आम्ही तिच अपेक्षा करीत आहोत. चोर किंवा साव आमदार मंत्री बनतो , नाही बनतो यापेक्षा घटनात्मक लोकशाही जिवंत ठेवणे हे प्रथम कर्तव्य आहे.ती अपेक्षा आम्ही महामहिम भगतसिंग कोशीयारी यांचेकडून करीत आहोत.
शिवराम पाटील
महाराष्ट्र जागृत जनमंच
९२७०९६३१२२