नेरी ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा जोतिबा फुले यांची जयंती साजरी.
विलास खोडपे.(नेरी)
दिनांक~११/०४/२०२२
थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले यांनी समतेवर आधारित समाजरचना हे सूत्र हाती घेत जाती व्यवस्थेमुळे पोखरलेल्या समाजाला परिवर्तनाची दिशा दिली. अज्ञानाला दूर सारण्यासाठी शिक्षणाचा मार्ग उजागर करत त्यांनी बहुजन आणि स्त्री शिक्षणाची पायाभरणी केली. संपूर्ण आयुष्य बहुजनांच्या उद्धारासाठी समर्पित करणारे थोर समाजसेवक महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज नेरी दिगर ग्रामपंचायत तफें विनम्र अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी सरपंच सुभाष मोरे , उपसरपंच प्रकाश भाऊ बोरसे, ग्रामसेवक गजानन चव्हाण, ग्राम पंचायत सदस्य विलास भाऊ खोडपे, वैशाली ताई बेलदार,हनिफ झारे, राष्ट्रवादी काँग्रेस नेरी गटप्रमुख रुपेश पाटील,मोहन गोडवे, प्रदीप चोपडे, युवराज भंगाळे,लिलाधर बोरसे, अरुण पाटील सह अन्य नागरिक उपस्थित होते.