राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्ताने, किराणा मालाचे किट वाटप.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०२/२०२२
संत, महंतांची शिकवण बरेच काही शिकवून जाते आपल्या या महाराष्ट्राच्या माय भुमित अनेक संत, महंत होऊन घेऊन गेलेत. त्यापैकीच एक असे त्यागमूर्ती राष्ट्रसंत गाडगे बाबा यांची नुकतीच जयंती साजरी करण्यात आली या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले. परंतु जनसेवा हीच ईश्वर सेवा हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून फत्तेपुर येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल रॉय मुळे यांनी कासमपुरा येथील एका व्यक्तीच्या परिस्थितीची माहिती झाल्यावर त्यांनी थेट कासंपुरा येथे येऊन सदर व्यक्तीस एक महिना पुरेल एवढे किराणा मालाचे कीट दिले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील कासमपुरा येथील रहिवासी बाबूलाल सुर्वे मागील बऱ्याच दिवसापासून आजारपणाने त्रस्त होते. त्यांची परिस्थिती हालाखीची होती. औषधोपचार झाल्याने घरात बिकट परिस्थिती निर्माण झाल्याने दोन वेळच्या भाकरीची चिंता सतावत होती. ही माहिती जामनेर तालुक्यातील फत्तेपुर येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल रॉय मुळे यांना मिळाली व त्यांनी राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून बाबूलाल सुर्वे यांचे घरी येऊन एक महिना पुरेल एवढा किराणा आणून त्यांच्या हातात दिला व विचारपुस केली.
या प्रसंगी विश्वसदादा बाविस्कर सर, (रोटवद) निलेश दादा चौधरी, (लोहारा), नितीन शेळके, नाना पवार, विलास परदेशी हे उपस्थित होत. इच्छुक दानशुर व्यक्तींनी शक्य होईल तेवढी मदत करावी असे अवाहन यावेळी राहुल मुळे यांनी केले.