गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल तर्फे आयोजित विज्ञान व हस्तकला प्रदर्शन शिबिर उत्साहात संपन्न.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०३/२०२३
शालेय जीवनात विद्यार्थ्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळवून देण्यासाठी पाचोरा येथील गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल तर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून हस्तकला व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या हस्तकला व विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन पाचोरा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. श्री. गिरीश जगताप साहेब यांच्या हस्ते फीत कापून व शिक्षण विभागाचे मा. श्री. योगेश अहिरराव सर, मा. श्री. शिरसाळे सर, शाळेचे प्राचार्य मा. श्री. प्रेमकुमार शामदानी सर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
या हस्तकला व विज्ञान प्रदर्शन शिबिरात इयत्ता दुसरी ते इयत्ता पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून टाकाऊ वस्तु पासून विविध सुबक, आकर्षक वस्तूंची निर्मिती करून टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवून दाखवल्या तसेच इयत्ता सहावी ते इयत्ता नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी हओलओग्रआफ, कार्बन सिस्टीम, जलशुद्धीकरण तसेच वेगवेगळ्या रासायनिक मिश्रणाच्या संयोगातून निर्माण होणारे अद्भुत व चमत्कारिक घटक उदाहरणार्थ एलिफंट टूथपेस्ट, ज्वालामुखीचा उद्रेक, ए. टी. एम, दोन विजेच्या तारा म्हणजे धन आणि ऋण यांचा एकमेकांशी संपर्क आल्यानंतरही शॉर्टसर्किट होत नाही यासारखे अनेक वर्किंग प्रोजेक्ट, मॉडेल व चार्ट तयार करुन प्रात्यक्षिक करुन दाखवले हे वर्किंग प्रोजेक्ट या कला प्रदर्शन शिबिराचे आकर्षक प्रोजेक्ट ठरले.
हे विज्ञान प्रदर्शनत ज्या विद्यार्थ्यांनी आपले प्रोजेक्ट सादर केले होते त्या विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनाला भेट देणारे पालक व मान्यवरांना प्रोजेक्ट बनवण्यासाठी लागणारे साहित्य ते कसे बनवले व त्यापासून होणारे फायदे या विषयावर सविस्तर माहिती दिली. प्रदर्शन पाहण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे, पालक व मान्यवरांनी प्रोजेक्ट सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप देऊन उस्फूर्तपणे चांगला प्रतिसाद दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते.
या विज्ञान व हस्तकला प्रदशनात हस्तकला व विज्ञानावर आधारित एकुण २७८ प्रोजेक्टचे सादरीकरण करण्यात आले. या विज्ञान व हस्तकला प्रदर्शन शिबिराच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ. अमेना मोहरा व सौ. मनीषा पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य या. श्री. प्रेम शामदानी सर यांनी केले. हस्तकला व विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.